टूलकीट नंतर आता दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या ‘गो बॅक मोदी’ ट्वीटनं खळबळ.. कोण आहे ही अभिनेत्री?


चेन्नई- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी जवळ-जवळ अडीच महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन विविध कारणांनी गाजत आहे. देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे, तर केंद्र सरकारवर विविध क्षेत्रातून टीकाही केली जात आहे. मध्यंतरी पर्यावरणवादी युवा कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने हिने टूलकीट प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आणि त्यावरून सरकारकडून कारवायाही सुरू आहेत.

पंतप्रधान मोदींनी वारंवार आपल्या भाषणांमधून आणि संसदेतही हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे स्पष्ट केले असले तरी शेतकरी आंदोलन करणाऱ्या संघटना ते मानायला तयार नाहीत. त्यावरून, पंतप्रधान मोदी यांच्यावर हेकेखोरपणाचा आरोप केला जात असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.आता या वादामध्ये  दाक्षिणात्य अभिनेत्री ‘ओविया हेलन’ हिने या वादात उडी घेतली असून तीने ‘गो बॅक मोदी’ असे ट्वीट करून खळबळ उडवून दिली आहे.

अधिक वाचा  #मराठा आरक्षण: 8 डिसेंबरला विधान भवनावर धडक मोर्चा

हेलेन नेल्सन असे मूळ नाव असलेल्या या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात 2007 साली “कंगारू’ या मल्याळम चित्रपटातून केली. त्यानंतर तिचे “अपूर्वा’,’नालाय नमधे’. ‘कालवणी’ ‘मरीना‘,या चित्रपट गाजले. ‘मुथुकु मुथागा’ या चित्रपटातील भूमिकेने तिला खरे प्रसिद्धीच्या झोतात आणले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

‘टूलकीट’ वरुण कारवाया सुरू आहेत. तसंच हेलेनला ‘गो बॅक मोदी’ असे ट्वीट करणं महागात पडण्याची शक्यता आहे. कारण तिच्याविरोधात भाजपचे तामिळनाडू राज्याचे सचिव डी अॅलेक्सिस सुधाकरन  यांनी पोलिस अधीक्षक आणि सायबर सेलकडे तक्रार केली आहे.हेलेनच्या या ट्वीटमागील शोध घेण्याची मागणीही भाजप नेत्यांनी केली आहे. हेलेन हिने राजकीय हेतुतून जनतेला भडकवण्यासाठी हे ट्वीट केले असून शांतता भंग झाल्याचा दावा सुधाकरन  यांनी केला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love