पुणे— ” अजित पवार भाजपसोबत जातील, याबाबत मला काही तथ्य वाटत नाही. अजित पवार (ajit pawar) हे शरद पवारांचे (sharad pawar) पुतणे आहेत. त्यांनी अजित पवारांना अनेक पदं दिली आहेत. शिवाय अजित पवार हे देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांचे चांगले मित्र आहे. त्यांनी यापूर्वी त्यांच्याबरोबर शपथदेखील घेतली होती. मात्र ते जर माझ्या पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल. त्यासोबतच आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर ती संधी आम्ही अजित पवारांना देऊ”, असे वक्तव्य रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athavale) यांनी केले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे मागील आठवड्यात नॉट रिचेबल होत. त्यामुळे अजित पवार पुन्हा भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali damaniya) या दिली आहे. अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच आणि आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, असं म्हणत त्यांनी थेट अजित पवारांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी केलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे. एकनाथ शिंदे(eknath shinde) रडले म्हणून उद्धव ठाकरे (udhav thakare)) पडले, असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहेत. ते रडणार नाहीत. एवढे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले ते उद्धव ठाकरेंना कंटाळून गेले, अशी टीकाही रामदास आठवले यांनी केली.