कोश्यारी खासगीत म्हणतात की,मला आता माझ्या राज्यात परत जायचं आहे- अजित पवार

We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

पुणे-राज्यपालांनी वक्तव्य करताना त्यांना कोणी राज्यपाल म्हणून नेमले आहे ते पाहावे. केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी त्यांना कडक शब्दात समज दिली पाहिजे. राज्यपालांकडून हे एकदा घडलेलं नाही. एकदा घडलं तर समजू शकतो. कधीकधी आमच्याकडूनही बोलताना चूक होते. तेव्हा आम्ही दिलगिरी व्यक्त करून मोकळे होतो. तसं एकदा घडलं नाही, सातत्याने घडतंय. राज्य सरकारचा त्यांना पाठीशी घालते आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात पुण्यात खासदार उदयनराजे भोसलेंसह काही शिवप्रेमी संघटनांची बैठक झाली. त्यामध्ये  संभाजीराजेंनीही राज्यपाल हटावची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडी म्हणून या विषयावर भूमिका घेणार का? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत काय म्हणतात हे सांगत आपली भूमिका मांडली. पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

राज्यपालांवर कारवाई व्हावी की न व्हावी? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “ज्यावेळी मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती अशाप्रकारची वक्तव्ये करतात त्यावेळी त्यांना त्या पदावर बसवणाऱ्या व्यक्तींनी संबंधितांना तसं सांगितलं पाहिजे.

अधिक वाचा  सूर्यनमस्कार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर ७५ कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ

दरम्यान, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत म्हणतात की, मला आता माझ्या राज्यात परत जायचं आहे. मग ते काही कारण आहे की काय हेही कळायला मार्ग नाही. या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं लंगडं समर्थ करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कोणत्याही व्यक्तीने अशाप्रकारे वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्र ते खपवूनही घेणार नाही,” असा इशारा अजित पवारांनी दिली.

अजित पवार म्हणाले, “खरंतर राज्यपालांच्या वक्तव्यावर आम्ही तातडीने प्रतिक्रिया दिल्या. मी तर २४ तासाच्या आत ट्वीटही केलं होतं, नंतर मला माझी भूमिका स्पष्ट करायची होती तीही सांगितली. परंतु, माझं पुन्हा पुन्हा सर्वांना सांगणं आहे की, बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न आपण बाजूला ठेवतो आणि असे गरज नसलेले प्रश्न निर्माण करतो. हे थांबवलं पाहिजे.”

“आपल्याकडे महत्त्वाचे विषय खूप आहेत. शेतकऱ्यांचे पीकविमा, वेळेत परतफेड करतात त्यांच्या ५० हजारांच्या कर्जमाफीचा प्रश्न, रब्बीचं पीक वाया गेलंय असे अनेक प्रश्न आहेत,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

अधिक वाचा  तर.. नरेंद्र मोदी काय चीज आहे?- शरद पवार

पोलीस भरतीवरून शिंदे-फडवणीस सरकारची नौटंकी

आजपर्यंतच्या इतिहासात कधीही पोलीस भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्तीचे पत्र मंत्री,आमदार मुख्यमंत्री यांनी दिलेले नाही. राज्यात बाहेर गेलेले रोजगार आणि त्यामुळे तरुणांमध्ये झालेली नाराजी आली आहे. त्यांना आलेले अपयश लपवण्यासाठी पोलीस भरतीवरून शिंदे फडवणीस सरकार नौटंकी करत असल्याची टीका अजित पवार यांनी यावेळी केली.

पोलीस भरतीमध्ये सुद्धा त्याचे नियम बदलण्याचा सरकारचा मानस दिसत आहे. परंतू आमच्या काळात अगोदरच शारीरिक परीक्षा त्यानंतर लेखी परीक्षा होत होती. त्यामध्ये सुद्धा खूप अडचणी आहेत. त्या सगळ्या अडचणी आणि नियम बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्या मी मुंबईत गेलो की उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्या संदर्भात माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत असेही अजित दादा पवार म्हणाले.

सीमा प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, माझे आणि शंभूराजे देसाई यांच्याशी बोलणे झालेले आहे. हा प्रश्न उच्च न्यायालयात असताना विनाकारण कर्नाटकचे मुख्यमंत्री यावर भाष्य करत आहेत. त्यांच्या राज्याचे काम करावे उद्या मी आणखी त्या ठिकाणी तिथल्या लोकांना भेटणार आहे. लोकांना कुठलीही गैरसोय होणार नाही ही दक्षता शासनाने घ्यावी. आमच्या काळात का झालं नाही असं म्हणाल तर, आमच्या काळात असा प्रश्न समोर आला नाही ,आता आला आहे तर कुठल्याही माणसाला तिथून परराज्यात जायची इच्छा होऊ नये अशी आमची मानसिकता आहे. ती व्यवस्था राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

अधिक वाचा  माझा नवरा वाघ होता आणि मी वाघीण आहे - स्वाती मोहोळ : नीतेश राणे यांनी घेतली शरद मोहोळ कुटुंबियांची भेट

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबतही अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर व्हायला हव्यात. ९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत आहे’, असं म्हणत अजित पवार यांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.

एखादा विषय न्यायव्यवस्थेच्या समोर असेल तर त्याचा अंतिम निर्णय न्यायव्यवस्थाच घेते. मात्र, सत्ताधारी असो की विरोधी पक्षाचे लोक असोत, सर्वांनी एक निर्णय घेतला पाहिजे. फेब्रुवारी २२ ला महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका व्हायला हव्या होत्या. आता डिसेंबरमध्ये १० महिने होतील, तरी निवडणुका होत नाहीत, अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love