भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोडमध्ये केंद्र सरकारने सुधारणा कराव्यात

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे – भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदला प्रमाणे केंद्र सरकारने आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोड मध्ये कामगार हिताच्या सुधारणा न केल्यास 21 डिसेंबर 2022 रोजी मुंबई येथे राज्य व्यापी लॉंग मार्च काढणार असुन या मध्ये हजारो कामगारांनी एकजुटीने सहभागी होवून श्रमिकांची , कष्टकरांची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी केले आहे.

भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाच्या वतीने आयोजित केल्याला वर्धापन दिनाच्या निमित्ताने जाहीर मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी अभय वर्तक, अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, विवेक ठकार उपस्थित होते.

संसदेच्या दोन्ही सभागृहात नुकतेच 44 कामगार कायद्यांचे 4 कोड बिल मध्ये रूपांतर केले आहे.  या मधील वेज कोड व सोशल सिक्युरिटी कोडचे भारतीय मजदूर संघाने स्वागत केले असुन या मुळे रोजगारात वाढ होईल,अशी अपेक्षा आहे. तसेच असंघीटत कामगारांची नोंदणी, कल्याणकारी योजना, ई श्रम पोर्टल व्दारे नोंदणी, नुतनीकरण ई लाभ कामगारांना  होणार आहेत. परंतु सरकारच्या आय. आर. कोड व हेल्थ अॅड सेफ्टी कोड मुळे भविष्यात कायम कामगारांच्या रोजगार, सेवा शर्ती, नोकरी मध्ये सुरक्षा, औद्योगिक कलह पध्दतीं,  न्यायीक  निवाडा पध्दतींमध्ये कामगार व कामगार संघटने समोर मोठ्या  प्रमाणात आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे आय आर कोड व हेल्थ अॅड सेफ्टी कोड  मध्ये कामगारांच्या हिताचे सुधारणा भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आहेत.  जर सरकारने भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदला प्रमाणे सुधारणा न केल्यास 21 डिसेंबर 2022 रोजी मुंबई येथे राज्य व्यापी लाॅग मार्च काढणार असुन या मध्ये हजारो कामगारांनी एकजुटीने सहभागी होवून श्रमिकांची , कष्टकरांची ताकद दाखवून द्यावी असे आवहान भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी केले.

भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले,  असंघीटत क्षेत्रातील कामगारांना लाभ मिळाले पाहिजे, कंत्राटी कामगारांना समान कामाप्रमाणे  समान वेतन , सोई सुविधा मिळल्या पाहिजे. वर्षानुवर्षे सातत्याने व नियमीतपणे रिक्त पदांवर, स्किम वर्कर्स कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट केले पाहिजे  सर्व कामगारांना महागाई प्रमाणात,  जिवन जगता येईल येवढी पेंशन मिळाली पाहिजे. महाराष्ट्र राज्य मध्ये 17 ऊद्योगातील कामगारांचे किमान वेतननाच्या दरात वाढ होण्याची मुदत संपून गेली आहे त्यामुळे या ऊद्योगातील सर्व कामगारांना नवीन वेतनवाढ मागील सर्व फरकासहीत मिळाली पाहिजे. 

नव्याने बदललेल्या कामाच्या परिस्थितीत कामगारास लाभ मिळण्यासाठी सक्षम व कार्यक्षम सरकारी यंत्रणा, तक्रारी निवारण केंद्र ची अंमलबजावणी काटेकोरपणे करून कामगारांना न्याय देण्यात यावा,  व दोषी कंत्राटदार, दोषी व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी मागणीही असे अर्जुन चव्हाण यांनी केली.

मागील वर्षांतील ठळकपणे कार्यक्रम चे वृत्त भामसंघ पुणे जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ यांनी 27 वेतनवाढ करार, 3 अभ्यास वर्ग ,  संप-आंदोलने, नवीन संघटना बाबतीत सविस्तर माहिती दिली आणि या पुढील काळात संघटनेचे काम असंघीटत क्षेत्रातील, कंत्राटी कामगार, अंगणवाडी, बांधकाम कामगार, स्वयंरोजगारीत कामगार ईतर आवर लक्ष केंद्रित करत, या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचा आवाहन  व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य शासकीय संघटनेचे पदाधिकारी  विवेक ठकार  महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे कार्याध्यक्ष उमेश आणेराव यांनी प्रास्ताविक केले व आभार प्रदर्शन  जिल्हा उपाध्यक्ष अण्णा महाजन   यांनी केले आहे.

या वेळी भारतीय मजदूर संघाच्या विविध संघटना, औद्योगिक, विज ऊद्योगातील कायम / कंत्राटी कामगार, ऐल आय सी,  संरक्षण उद्योग, बॅंक,  शासकीय कर्मचारी,  सुरक्षा रक्षक, बिडी कामगार, बांधकाम कामगार, घरेलु कामगार,  विविध ऊद्योगातील पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *