#Solapur Loksabha : राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे आणि सातपुतेंमध्ये ‘लेटर कोल्ड वॉर’ सुरू

'Cold Letter War' between Praniti Shinde and Satpute
'Cold Letter War' between Praniti Shinde and Satpute

Praniti Shinde :Ram Satpute – भाजपने (bjp) काल (रविवार) लोकसभा 2024 (Loksabha 2024) साठी आपली पाचवी यादी जाहीर केली. 111 जणांच्या या यादीत महाराष्ट्रातील तीन नावे आहेत. त्यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या सोलापूर मतदार (Solapur Constituency) संघातून माळशिरसचे (Malshiras) आमदार राम सातपुते(MLA Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi) प्रणिती शिंदे (Praniti Shinde)आणि महायुतीचे राम सातपुते यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना जाहीर पत्र लिहिले आहे तर राम सातपुते यांनीही त्याला जाहीर पत्रानेच उत्तर दिले आहे. त्यामुळे प्रचाराला सुरुवात या दोघांच्या ‘कोल्ड लेटर वॉर’ने ( Letter Cold War) सुरू झाली असून त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राम सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय समजले जातात. सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना पुन्हा उमेदवारी नाकारत राम सातपुते यांना संधि दिली आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे  यांच्याविरोधात राम सातपुते लढणार आहेत. राम सातपुते  यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर आज भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सोलापुरातून भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके उडवत जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे आमदार राम सातपुते यांचा लढा आता लोकसभेच्या रिंगणात रंगणार आहे.

अधिक वाचा  बारावी परीक्षा प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाइन मिळणार : वाचा डाऊनलोड करण्याची प्रक्रिया

त्यानंतर प्रणिती शिंदे यांनी लगेचच एक जाहीर पत्र राम सातपुतेंना लिहिले आहे तर राम सातपुते यांनीही त्यांना जाहीर पत्रानेच उत्तर दिले आहे.

काय म्हटले आहे प्रणिती शिंदेंणी पत्रात?

मा. राम सातपुते जी,

आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो की बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्ताने शुभेच्छा देते.’

लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि मतदारसंघाचा विकसा हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई एकमेकांविरोधात लढत राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते.’

अधिक वाचा  अन्यथा १ ऑक्टोबरनंतर उस तोडणी कामगार कामाला जाणार नाहीत

सोलापूरकरांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि शुभेच्छा देते.’

प्रणिती सुशीलकुमार शिंदे

काय म्हटले आहे राम सातपुते यांनी त्यांच्या पत्रात?

आ. प्रणिती शिंदेजी,

जय श्रीराम…!

मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय.

मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय.

अधिक वाचा  #Sharad Pawar लवकरच आणखी एका राज्यातील मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा या सरकारचा डाव - शरद पवार

राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन.

वंदे मातरम्…!

आपला विनीत,

राम सातपुते

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love