Admit card for Class XII exams will be available online from tomorrow

प्रतीक्षा संपली: बारावीचा निकाल उद्या (८ जून)

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

पुणे–राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) कधी जाहीर होणार याची पालक आणि विद्यार्थ्यांना लागलेली प्रतीक्षा संपली आहे. ८ जून म्हणजेच उद्या (बुधवार)  बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

दुपारी एक वाजताच्या दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहाता येणार आहे.यंदा करोना व्हायरसच्या कमी झालेल्या प्रादुर्भावाने या परिक्षा ऑफलाइन घेण्यात आल्या होत्या. यंदाच्या बारावीच्या परिक्षांच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही उत्सुकता आहे. बारावीचं वर्ष विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्वाचं वर्ष मानलं जातं. बारावीच्या परिक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल अशा घेतल्या गेल्या होत्या. राज्यातल्या १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. आता मात्र त्यांच्या  निकालाची प्रतीक्षा संपली आहे.

देशातले दहावी आणि बारावीचे निकाल याआधीच जाहीर करण्यात आले होते. राज्यात मात्र हे निकाल कधी जाहीर होणार याकडे पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. उद्या बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच दहावीचा निकाल जाहीर होईल अशी पालकांना अपेक्षा आहे.

यंदा राज्यात विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतला नव्हता. त्यामुळे यंदा दहावी बारावीच्या निकालांबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित झालं होत. आता मात्र बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याने पालक आणि विद्यार्थीवर्गाची चिंता मिटली आहे. सर्वसाधारणपणे जूनच्या सुरुवातीलाच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होतात. तीच परंपरा यंदाही कायम राहिली आहे.

कुठे पहाल निकाल?

msbshse.co.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in.

कसा पहाल निकाल?

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जा. होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका,कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.

निकालाबाबत गोंधळ

उद्या (८ जून) बारावीचा निकाल लागणार अशी माहिती सोशल मिडीयावर आज सकाळपासून (मंगळवार) व्हायरल झाली होती. मात्र, बारावीच्या निकालाबाबत अद्याप अधिकृत कुठलीही माहिती नाही,अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन  मंडळाकडून करण्यात आले होते. त्यामुळे निकलाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शले शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांनी अधिकृत घोषणा केल्याने उद्या( दि. ८ जून) बारावीचा ऑनलाइन निकाल लागणार हे निश्चित झाले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *