पुणे महानगरातील श्री रामजन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलनअभियान पूर्णत्वाच्या दिशेने:सर्वसामान्यांपासून तृतीय पंथीयांनीसुद्धा नोंदवला सहभाग


पुणे -श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने पुणे महानगरात १५ जानेवारी पासून निधीसंकलन अभियान सुरु आहे. त्यात एकूण ६ लाखापेक्षा अधिक परिवारापर्यंत स्वयंसेवक पोहोचले असून निधीसंकलनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्धांसह, भाजीवाले, पेपर टाकणारे, दुधवाले, कामगार वर्ग आणि तृतीय पंथीयांनीसुद्धा अभियानात सहभाग नोंदवत निधी दिला आहे. अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी संकलन अभियानाचे  पुणे महानगर सहप्रमुख महेश पोहनेरकर यांनी दिली.

प्रभू श्रीरामाचा जयजयकार, घराघरात उत्साहाने होणारे स्वागत आणि निधी संकलनास उस्फूर्त प्रतिसाद यामुळे  कार्यकर्त्यांचे कामाचे मनोबल वाढत गेले आणि पुणे महानगरातील अभियान आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत (Towards the completion of Shri Ram Janmabhoomi Temple Construction Fundraising Campaign)आहे. पुणे महानगरातील एकूण एकूण ४९०  वस्‍त्‍यांपैकी जवळपास ९० टक्के  वस्‍त्‍यांपर्यंत संपर्क झाला आहे. एकूण २५४६  उपवस्‍त्‍यांपैकी २३०० पेक्षा जास्त  उपवस्‍त्‍यांपर्यंत  स्वयंसेवकांच्या माध्यमातून निधीसंकलन अभियान पोहोचले आहे, असे सांगून संकल्प केलेल्या अंदाजे १०  लाख परिवारांपैकी ६ लाखांपेक्षा अधिक  परिवारांपर्यंत  कार्यकर्ते प्रत्‍यक्ष पोहोचले आहेत. असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट नाही

संपर्क अभियानात  आत्तापर्यंत  १८  हजाराहून अधिक  रामभक्‍तांनी सहभाग घेतला.विशेष म्हणजे  त्‍यात  3 हजार  महिलांचा देखील सहभाग आहे. वेगवेगळ्या वस्‍त्‍यांमध्ये  या संपर्काच्‍या रचनेसाठी किमान ३  दिवस पूर्णवेळ अभियानासाठी  म्‍हणून ७२८ जणांनी सहभाग घेतला. राहिलेल्‍या सर्व वस्‍त्‍या आणि उपवस्‍त्‍यांपर्यंत  पोहोचून  अभियान शंभर  टक्के यशस्वी होईल असा विश्वास पोहनेरकर यांनी व्यक्त केला.

बाळ मामाकडून निधी

प्रभू श्रीराम चरणी माझेपण योगदान तुम्ही स्वीकारा आणि माझे जीवन सार्थकी करा,  श्रीरामाची सेवा करायची संधी मला द्या असे म्हणत श्री बाळमामा (नगमा) गजेंद्र कांबळे (तृतीयपंथी)  लोकमान्य वस्ती परमहंस नगर, पौड रोड, कोथरूड यांनी राम मंदिर उभारणी साठी निधी दिला.

त्यांच्या घरी आम्ही गेल्यावर जसे सामान्यपणे स्वागत होते तसेच आमचे चहा पाणी देऊन स्वागत त्यांनी केले, त्यावेळी प्रभू श्रीरामाच्या मंदिराला माझ्या भिक्षेतून मिळालेल्या पैशातून निधी घ्या असे मत त्यांनी व्यक्त केले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love