तब्बल २४ वर्षांनी एकत्र येत कण्वमुनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या जुन्या आठवणी

Former students of Kanvamuni Vidyalaya brought together old memories after 24 years
Former students of Kanvamuni Vidyalaya brought together old memories after 24 years

पिंपरी-चिंचव( प्रतिनिधी) : तब्बल २४ वर्षांनी एकत्र येत कंदर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील कण्वमुनी विद्यालयाच्या दहावीच्या १९९९-२००० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पाडला. हे सर्व शक्य झाले ते सोशल मीडियामुळे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना एकत्र करून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी मनोज रोकडे, पांडुरंग भगत, अमर कदम, भारत साळुंखे, रेवन माने, दत्तात्रय केदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सर्व सन्मानिय गुरुवर्य यांना पुष्पगुच्छ, आंब्याचे रोप देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कायमची आठवण म्हणून सर्व विद्यार्थ्यांनाही आंब्याचे रोपटे भेट देण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक नवनाथ भांगे, प्राचार्य सुनिता कदम, माजी प्राचार्य भारत पागळे, माजी प्राचार्य जी. एन. पवार, माजी प्राचार्य वसंत नलवडे, माजी प्राचार्य बी. एस. पवार, निवृत्त शिक्षक युवराज साळुंखे, बोराटे सर, विष्णू फंड, शिक्षिका रोहिणी वीर, शोभा लांडगे, लिपिक देविदास डोके, रशिद पठाण आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  आज पुण्यातील स्त्रिया जे काही करत आहेत ते बघून कौतुक वाटते - अमृता खानविलकर :  'मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स २०२३' उत्साहात संपन्न

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील जुन्या आठवणींना व शिक्षकांच्या अनुभवांना उजाळा दिला. सर्वांनीच अतिशय चांगले अनुभव सर्वांसमोर व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारत पागळे यांनी मनोगत व्यक्त करताना नीतिमूल्यांचे महत्त्व पटवून दिले.

याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा, तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या त्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमर कदम, गणेश घाडगे, मनोज रोकडे, पांडुरंग भगत, एकनाथ पाटील, भारत साळुंखे, बिभीषण साळुंखे, दत्तात्रय केदार, भगवान सावंत, समाधान कदम, रामहरी जगताप, सतीश निकम, ज्ञानेश्वर डोके, ज्ञानेश्वर टकले, संतोष चव्हाण, रेवननाथ माने, भाऊसाहेब सातव, कैलास सुतार, इर्शाद शेख, शिवाजी लोंढे, शिवाजी राणे, भारती पाठक, पुष्पा तळे, चंद्रकला तळे, आशा पवार, नीता तळे, सुवर्णा चव्हाण, वंदना बदे, वंदना डोंगरे, मनीषा बसळे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक वाचा  मुल होत नाही म्हणून नवऱ्याने घातला दुसऱ्या लग्नाचा घाट : पत्नीची आत्महत्या

सर्व शिक्षकांनी विचार व्यक्त करीत माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन पांडुरंग भगत यांनी, प्रास्ताविक अमर कदम यांनी, तर आभार रामहरी जगताप यांनी मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love