विरोधी विचारांना देशद्रोहाचे रूप दिले जात आहे


पुणे-‘अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य कोणी कोणाला उचलून देण्याची गोष्ट नाही. लेखकांवर-कलाकारांवर अघोषित बंदी आली आहे. समाजाला लेखन स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती निरर्थक वाटू लागली आहे. विरोधी विचारांना देशद्रोहाचे रूप दिले जात आहे. (Opposition views are being branded as treason) राजधर्माच्या नावाखाली धार्मिक हिंस्रपणा वाढत आहे,’ अशा शब्दांत कवयित्री अनुराधा पाटील यांनी सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे स्वातंत्र्य सैनिक अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात पाटील बोलत होत्या. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आरोग्य मंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील आणि कृषी अभ्यासक विलास शिंदे यांना ‘रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी होते.

अधिक वाचा  सत्तेतील लोकं संविधानाला महत्त्व देत नाहीत की काय असा प्रश्न पडतो- का म्हणाले असे रोहित पवार?

‘सामान्यांच्या जगण्याचा संकोच करणाऱ्या वृत्ती वाढत असल्याने जगणे अवघड होत आहे. लोकशाहीचे सर्व फायदे घेऊन हुकूमशाही राबवण्याचे जुनेच प्रकार पुन्हा पुन्हा सुरू आहेत. आपण म्हणू तेवढीच लोकशाही आणि इतरांच्या बाबतीतल्या अपमानजनक विधानांचा अनुभव आपण घेत आहोत. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींची आणि संस्थांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. शहरांची नावे बदलून लोकांच्या आयुष्यात फरक पडेल का, यावरून लोकांचे मत विचारात घेतले जात नाही,’ अशी टीका त्यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love