तुमचा गुलबरावांवर विश्वास, आमच्या नाथाभाऊंवर नाही –चंद्रकांत पाटील


पुणे(प्रतिनिधि)—भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची पक्षांतर्गत नाराजी आणि त्यांच्या पक्षांतरबाबत दररोज उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तसेच एकनाथ खडसे आपली पक्षातील नाराजी उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे एकनाथ खंडसे यांनी बंद खोलीत थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. पण त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे(वाहिन्या) वापरू नये असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते.

आता शिवसेनेचे नेते गुलांबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांचे पक्षांतर निश्चित आहे असे म्हटले आहे त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी, नाथाभाऊंनी वारंवार सांगितले आहे की ज्या पक्षात मी वाढलो, मोठा झालो त्या पक्षाचे नुकसान मी करणार नाही. मात्र, तरीही तुमचा गुलाबरावांवर विश्वास आहे, आमच्या नाथाभाऊंवर नाही अशी मिश्किल टिप्पणी पत्रकारांशी बोलताना केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदरच का घेतला गेला नाही?- चंद्रकांत पाटील