प्रभाग रचना निर्णयाला पक्षीय स्वरूप नाही – बाळासाहेब थोरात


पुणे- महापालिका निवडणुकीसाठी जो प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे त्याला पक्षीय स्वरुप नसून तो.एकमताने घेतलेला निर्णय असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही एकत्र सत्तेत आहोत. चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जितके शक्य होईल, तितके आम्ही एकत्र लढण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे देखील यावेळी थोरात म्हणाले.

पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान थोरात पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, प्रभाग रचनेत मत-मतांतरे होती. प्रत्येकाच वेगळे म्हणणे होते. शेवटी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय एकमताने घेतला आहे. कोणीही पक्षाचा विचार करता निर्णय घेतलेला नाही. जेवढा प्रभाग रचनेचा फायदा सत्ताधाऱ्यांना होतो, तेवढा विरोधकांनाही होतो. चारचा प्रभाग असावा की दोनचा असावा, अशी चर्चा होती  असे असताना तीनचा प्रभाग निश्चित करण्यात आला आहे.

अधिक वाचा  ‘घर चलो अभियानाच्या’ माध्यमातून दहा ते बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा मेगा प्लॅन

नुकसानीची आकडेवारी निश्चित झाल्यावरच निर्णय

गुलाब चक्रीवादळाचा मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे. शुक्रवारीपर्यंत पाऊस सुरू होता. नुकसानीची आकडेवारी निश्चित झाल्यावरच निर्णय घेतला जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

दोन वर्षे हे नैसर्गिक संकटाचे गेले आहे. दोन चक्रीवादळ, महापूर त्यानंतर गतवर्षी अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर करावी लागली. या वर्षी अतिवृष्टीचा कोकणात पहिला फटका बसला. त्यांनतर गुलाब चक्रीवादळाचा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठकदेखील झालेली आहे. एकंदरीत नुकसानीचे स्वरुप आणि त्याची आकडेवारी पाहता ते एकत्र करणे आवश्यक असते. तशा पद्धतीची काळजी घेतली जात आहे. तसेच असे कोणी सांगत असेल की शेतात जा आणि तेथून फोटो पाठवा तर त्याच्यावर कारवाई करू, अशा इशाराही महसूल मंत्र्यांनी दिला आहे.

अधिक वाचा  लोकसंगीत आणि तबला -खंजिरी - कथ्थक च्या जुगलबंदी ने गाजवला 'तालचक्र' महोत्सवाचा पहिला दिवस

ई अॅप ही नव्या युगाची सुरुवात आहे. महसूल विभागाचा विषय त्यातील कायदेशीर बाबींपुरताच आहे. राज्याच्या पीक नियोजनाकरता विशेषतः कृषी पणन किंवा मदतीचा विषय असेल त्यासाठी हे प्रत्येक ठिकाणी उपयोगी असणार आहे. त्याचा नियोजनात खूप फायदा होणार आहे. ही नव्या युगाची सुरुवात आहे. हे आपल्याला करावेच लागणार आहे. सुरुवातीला थोडा त्रास होईल. पण त्याचा नंतर फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love