अशावेळी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांचे कॉँग्रेसमध्ये स्वागतच – सुशीलकुमार शिंदे

राजकारण
Spread the love

पुणे- काँग्रेस चढत्या क्रमांकावर नसून ती खाली येत आहे. अशावेळी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांच्यासारखी मंडळी काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

लोकशाहीसाठी समंजस संवाद आणि डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिक नेटवर्क यांच्यावतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक विजय नाईक आणि ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

शिंदे म्हणाले, गेल्या 5 -6 वर्षांपासून कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे दोघे काँग्रेसच्या संपर्कात होते. पण, त्यांनी कधी पक्षात येण्याची भूमिका घेतली नाही, आता त्यांनी काँग्रेसचे विचार मान्य केल्याचे दिसते. आज काँग्रेस चढत्या क्रमांकावर नसून ती खाली येत आहे. अशावेळी ही मंडळी काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

राज्यात काँग्रेस कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र येत आहे. राज्यात शिवसेनेबरोबर जात असताना काँग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्राम स्वीकारला. त्यामुळे, हिंदुत्ववादी अशी काही भूमिका नाही, असे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना योग्यरित्या चालवता आली नाही. म्हणून तिन्ही पक्षांना कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र यावे लागले. केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर, जनतेची सेवा करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत, असे देखील शिंदे यांनी सांगितले.

संधी घ्यावी लागतेसंधी ही घ्यावी लागते. सुशील कुमार शिंदे हे कोणालाच माहीत नव्हते. संधी घेतल्यानंतर सगळ्यांना माहीत झाले की सुशीलकुमार शिंदे कोण आहेत. म्हणून राजकारणात तरुणांना संधी द्यावी लागत नाही, ती त्यांनी घ्यायची असते, असे सल्ला देखील शिंदे यांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *