The DNA of conspiracies is BJP's

समस्त काँग्रेस जनांनी ‘व्यापक देश हितासाठी’ एकजुटीने ‘भारत जोडो’यात्रेत सहभागी होणे, काळाची गरज – गोपाळदादा तिवारी

राजकारण राष्ट्रीय
Spread the love

पुणे-  देशाच्या सार्वभौम व व्यापक हितासाठी, सामाजिक सलोखा व सदभावनेच्या वाढीसाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी “देशातील समस्त काँग्रेस जनांनी अर्थातच् पक्षांतर्गत मत-मतांतरे असणारे नेतेगण, समर्थक इ.नी भाजपच्या ‘देश विघातक’ राजकारण विरोधी सर्वांनीच, कोणताही गट-तट न ठेवता, मा. राहूलजी गांधींच्या नेतृत्वाखालील, सर्वपक्षीय ‘भारत जोडो’ यात्रेत शक्य तेथे किमान अवधीत सहभागी होऊन, विद्यमान सरकार विरोधी ऐक्याचा संदेश देणे, ही काळाची गरज असल्याचे आवाहन काँग्रेस नेते व जेष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी आज पुणे येथे केले.

सदर यात्रा काढण्यामागील हेतू हा ‘देशाची सद्य:स्थिती’विषयी जनतेची भावना जाणून घेणे, निव्वळ जाहिरातींद्वारे होत असलेली आभासात्मक दिशाभूल व वास्तवता देशवासियांना अवगत करणे हा आहे.  सत्ताघिशांकडून धर्मांधतेचा होत असलेला विखारी प्रसार, घटनात्मक – संवैधानिक मुल्यांची पायमल्ली, एकाधिकारशाहीकडे वाटचाल, वाढत्या महागाई – बेरोज़गारीची चर्चा संसदेत घडवू न देण्याची सत्तापक्षाची भूमिका, देशाची सर्व साधन संपत्ती ‘ऊद्योजक मित्रांच्या’ घशात घालण्याचे प्रकार, राष्ट्रीय बँकांचे वाढती बुडीत कर्जे, वाढता भूकबळीचा दर, अर्थव्यवस्थेची धसरण व ६५ वर्षांच्या तुलनेत ७ वर्षात सु. २।। पटीने देशावर वाढलेले कर्ज इ. सर्व गंभीर बाबींची व देशाच्या ज्वलंत परिस्थिती’ची दखल घेत, पक्ष हितापेक्षाही, देशहित लक्षात घेऊन, काँग्रेस नेते मा.  राहूलजी गांधी यांचे पुढाकाराने विविध पक्ष, संस्था व विचारांच्या नेत्यांना सोबत घेऊन, ३५७० किमी च्या ‘भारत जोडो’ यात्रेत प्रसंगी काँग्रेसचे चिन्ह देखील न वापरता, व्यापक देशहिता करीता व देश वाचवण्या करीता, ‘राष्ट्रीय तिरंगा’ झेंड्याखाली ही देशव्यापी पदयात्रा सुरू झाली आहे.

विविध स्तरातून या यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशावेऴी देश ऊभा करणाऱ्या कुठल्याच काँग्रेस नेत्याने अलिप्त राहू नये हीच् काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना असल्याचे काँग्रेस नेते गोपाऴदादा तिवारी यांनी सांगीतले..

 ज्या काँग्रेस पक्षाने देशास स्वातंत्र्य मिळवून दिले… तो काँग्रेसचा सच्चा सैनिक अशा निर्णायक वेऴी घरात बसू शकत नाही. त्यामुळे व्यक्तीगत मानपान, निमंत्रण इ. कडे लक्ष न देतां.. ‘समस्त काँग्रेस जनांनी, संपुर्ण ताकदीने ही यात्रा यशस्वी करणे व सर्व प्रथम ‘देश-वाचवणे’ हे प्रत्येक काँग्रेसजनांचे देशाप्रती कर्तव्य ठरेल, असे आवाहन गोपाळदादा तिवारी यांनी जाहीर निवेदनाद्वारे केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *