पुणे–‘हम दो हमारे दो’चा नारा, राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी लग्न करून’ हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने करावे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दिल्लीत सुरूर असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, अदानी आणि अंबानी या विषयांशी संबंध नाही . ते शेतमाल घ्यायला जाणार नाहीत. राहुल गांधींचा जो आरोप आहे, या आरोपांमध्ये तथ्यता नाही. राहुल गांधी हे शेतकरी आंदोलनांना चुकीची दिशा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या कायद्यात एवढंच आहे की शेतकरी आपला माल जिथं जास्त पैसे मिळतील तिथं विकू शकतात. शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदा नाही. शेतकरी असल्याने आम्हाला खायला मिळतंय याची आम्हाला कल्पना आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कायदा आणलेला आहे. मात्र, गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोप प्रत्यारोप चालले आहेतच. सर्व विरोधक एकवटले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरातील शेतकरी त्यांच्या विरोधात नाहीत. पंजाब, हरियाणा येथील शेतकरी विरोध करत आहेत. मूळ शेतकरी आंदोलनात आलेला नाही असेही ते म्हणाले.