नानांना त्यांची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण … अजित पवार म्हणाले …


पुणे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती त्यावरून महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.  यावर अजित पवारांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना  स्पष्टीकरण दिले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन बनवल आहे. हे तिघे नेते जोपर्यंत या सरकारच्या पाठीशी आहे आहे तोपर्यंत हे सरकार भक्कम आहे. मात्र मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करण्यात गैर नाही तसेच प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेना असेल किंवा कॉंग्रेस प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असे अजित पवार म्हणाले.आत्ताचा फॉर्म्युला हा उद्धव  ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा आहे.  नानांना त्यांची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी 145 ची मॅजीक फिगर लागते. ती ज्याच्याकडे असते तो मुख्यमंत्री होतो असा चिमटा त्यांनी काढला.

अधिक वाचा  मराठी आणि कानडी यांना एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी केली - शरद पवार

सध्या महाविकास आघाडी भक्कम करण्याकडे आमचे लक्ष – जयंत पाटील

दरम्यान, नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाबाबत इच्छा व्यक्त केली. नाना पटोले कोणत्या संदर्भात बोलत आहेत, हे माहिती नाही. ते भविष्यातील निवडणुकी बाबत बोलत आहे. हे मला प्रसार माध्यमातुन समजत आहे. तसेच कोणी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न असून आम्ही  महाविकास आघाडी भक्कम व्हावी. या प्रयत्नात आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  निसर्ग मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,  सोलापूरचे पालकमंत्री दत्तत्रय भरणे आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, नाना पटोले यांनी के बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. सध्या महाविकास आघाडी भक्कम करण्याकडे आमचे लक्ष आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love