नवी दिल्ली- केंद्र सरकारने परित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये जवळजवळ अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, कलाकार,खेळाडू अशा विविध क्षेत्रातील मंडळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काहीजनांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे तर काहींनी हे षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही आता यामध्ये उडी घेतली आहे. सोनाक्षीने शेतकर्यांसाठी एक कविता वाचली आहे जी खूप व्हायरल होत आहे.
कवी वरद भटनागर यांनी शेतक शेतकऱ्यांसाठी लिहिलेली ही अत्यंत भावनिक कविता वाचून सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या काव्याचे शीर्षक आहे ‘क्यो’
कवितेच्या व्हिडिओसह सोनाक्षीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘नजरें मिलाके खुद से पूछो- क्यों?’ (‘स्वतःकडे पाहा आणि स्वतःला विचारा – का?’) ती पुढे लिहिले आहे की ही कविता त्या हातांना समर्पित आहे ज्यामुळे आपण दररोज अन्न खातो.
सोनाक्षी व्हिडिओमध्ये कविता वाचते….
“क्यों, सब पूछते हैं क्यों हम सड़कों पर उतर आए हैं।
खेत खलिहान के मंजर छोड़े, क्यों बंजर शहरों में घुस आए हैं
ये माटी, बोरी, हसिया, दरांती वाले हाथ, क्यों हमने राजनीति के दलदल में सनवाए हैं
दही, मक्खन और गुड़ वालों ने क्यों इरादे मशालों से सुलगाए हैं
अरे बूढ़ी आखों, नन्हें कदमों ने क्यों ये दंगे भड़काए हैं
दंगे, ये तुम्हें दंगे दिखाई देते हैं, क्यों
अपने ही हिस्से की रोटी खाना जायज नहीं है, क्यों
मक्के की रोटी, सरसों का साग, वैसे तो बड़े चटकारे लेते हो
अब उन्हीं के खातिर ये सब करना ठीक नहीं है, क्यों
नजरें मिलाकर जरा खुद से पूछो, क्यों”
दबंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सोनाक्षी सिन्हा बर्याचदा सामाजिक विषयांवर उघडपणे व्यक्त हॉट असते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सोनाक्षी आपले मत व्यक्त केले आहे. 26 जानेवारीच्या हिंसाचारानंतर सोनाक्षी यांनी दिल्ली एनसीआरमध्ये इंटरनेट बंद करण्याबद्दलही जोरदार मत व्यक्त केले होते.