देशातील मोठय़ा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश


पुणे–महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी छापे घालत देशातील मोठय़ा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. हिमाचल प्रदेशातील वेगवेगळय़ा जिल्हय़ांमध्ये ही कारवाई केली गेली आहे. यामध्ये दोघांना ताब्यात घेतले असून, मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे लोहमार्ग पोलिसांनी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ड्रग्ज पेडलरवर कारवाई करून कोटय़वधी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले होते. त्याअनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ड्रग्ज माफियांचा दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का? हेही तपासले जात आहे.

लोहमार्ग पोलिसांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईत कोटय़वधी रुपयांचे 34 किलो चरस जप्त केले होते. हे चरस पुण्यात मनालीवरुन आणण्यात आले होते. येथून गोवा, मुंबई, बंगलूर आणी पुणे शहरात ते विकले जाणार होते. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट आणि हॉटेल व्यावसायिकासह दोघांना अटक करण्यात आली होती. ललितकुमार दयानंद शर्मा (49,रा. व्हिलेज शमशी, हिमाचल), कौलसिंग रुपसिंग सिंगल (40, रा. कुलू, हिमाचल) अशी आरोपींची नावे होते. आयपीएस अधिकाऱयांच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून मनालीवरून पुण्यात चरस येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार तब्बल महिनाभर पाळत ठेऊन ही कारवाई केली गेली. महामार्ग पोलिसांची काही पथके मनालीला तपासासाठी रवाना केली होती. याची व्याप्ती मोठी असल्याने केंद्रीय व राज्य पातळीवरील तपास यंत्रणांना याची माहिती देण्यात आली होती.

अधिक वाचा  दहशदवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून पुण्यातील दोन संशयितांना अटक - तरुणीचा समावेश

गुन्हय़ाची व्याप्ती सहा राज्यांमध्ये पसरलेली आहे. यामुळे याची माहिती व तपासास सहकार्य करण्याची विनंती केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक व महाराष्ट्र एटीएसला करण्यात आली होती. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांची सहा पथके हिमाचल प्रदेशात तपासाला रवाना झाली. महाराष्ट्र एटीएसने केलेल्या कारवाईत लोहमार्ग पोलिसांची सहा पथकेही सहभागी झाली आहेत, अशी माहिती लोहमार्गचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love