देशातील मोठय़ा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

पुणे–महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी छापे घालत देशातील मोठय़ा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. हिमाचल प्रदेशातील वेगवेगळय़ा जिल्हय़ांमध्ये ही कारवाई केली गेली आहे. यामध्ये दोघांना ताब्यात घेतले असून, मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे लोहमार्ग पोलिसांनी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ड्रग्ज पेडलरवर कारवाई करून कोटय़वधी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले होते. त्याअनुषंगाने […]

Read More

मैत्रिणीसोबत लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणाला लुबाडले

पुणे – मैत्रिणीसोबत लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणाची चारचाकी गाडी अडवून त्याला मारहाण करत त्याच्याजवळ रोख रक्कम लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भुशी येथील एका रिक्षा स्टँडजवळ हा प्रकार घडला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी वेदांता सितष किसन चंदानी (वय 24, रा. वरळी, मुंबई) या तरुणाने तक्रार दिली […]

Read More

आम्ही मुंबईतून काहीच घेऊन जायला आलेलो नाही- योगीआदित्यनाथ

मुंबईः उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारणार असल्याचे वक्तव्य केल्यापासून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. दरम्यान, योगी दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आल्यानंतर तर, या चर्चेला आणखीनच उधाण आले होते. महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये यावरून शाब्दिक द्वंद्व सुरु होते. काही झाले तरी बॉलीवूड मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा […]

Read More

वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान ऐवज चोरी करणारी टोळी जेरबंद

पुणे- पिंपरी परिसरात पार्किंग मध्ये थांबलेल्या वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान ऐवज चोरी करणाऱ्या टोळीस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. .आरोपींच्या ताब्यातून 18 लॅपटॉप, तीन वायफाय डोंगल, एक कॅमेरा लेन्स, सात लॅपटॉप बॅग असा एकूण 12 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बबन काशिनाथ चव्हाण (वय-39,रा.तिऱ्हे तांडा, उत्तर […]

Read More