मंडई गणपतीचे २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून चोर पसार


पुणे- पुण्यातील मंडई परिसरातील प्रसिद्ध शारदा गणेश मंदिरात मध्यरात्री सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरटे २५ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

शारदा गणेश मंडळ हे पुणे शहरातील प्रमुख मंडळापैकी एक गणेश मंडळ आहे. अनेक पुणेकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिरात चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मंदिरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. आज पहाटे जेव्हा काही नागरिक मंदिरात गेले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती. विश्रामबाग पोलिसांनी हे तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

अधिक वाचा  अभिनेते रवींद्र मंकणी यांचे पुत्र व भाजपचे चित्रपट आघाडीचे पुणे शहराध्यक्ष रोहण मंकणी यांना अटक

या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात म्हणाले की, मंदिराच्या मुख्य मंडपात आज रात्री 1.30 ते 2.30 च्या दरम्यान तोंडाला मास्क लावून एकाने आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्याने बापाच्या मूर्तीवरील दोन सोन्याचे हार, एक मंगळ सूत्र, कंठी असे मिळून अंदाजे २५ तोळं सोने आणि दान पेटी मधील काही रक्कम चोरली आहे.

ही चोरी करत असताना आरोपीच्या चेहर्‍यावरील मास्क खाली आल्याने, त्याचा चेहरा दिसून आला आहे. हा सर्व प्रकार मंदिरामधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या घटनेची माहिती मिळताच आम्ही सर्वानी पाहणी केली. पोलिस देखील सर्व बाजूने तपास करीत असल्याचे थोरात यांनी सांगितले.

काही वर्षांपूर्वी याच मंदिरातील तब्बल 50 लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते. सोबतच एक नेकलेसही चोरट्यांनी चोरून नेला होता. या सर्व घटनेमुळे तेव्हा एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पहाटे सुद्धा असाच प्रकार घडला. विश्रामबाग पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love