भाजपने केला संकल्प: दोन हजार ऑक्सीजन बेडस् आणि दहा हजार रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करणार


पुणे- पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेडची, ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आणखी उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार आहे. ही गरज लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आपले ‘सामाजिक दायित्व’ म्हणून जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी भाजपने पुण्यामध्ये दोन हजार ऑक्सीजन बेड आणि दहा हजार रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने संजीवन हॉस्पिटलमध्ये उभारलेल्या 40 ऑक्सीजन बेडच्या रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या संसर्गानंतर मधल्या काळात संसर्ग कमी झाला आणि आपण जास्त रिलॅक्स झालो.  तसं  रिलॅक्स न होता सगळ्या वैद्यकीय सुविधा उभ्या कराव्या लागतील.  त्यामुळे भारतीय जनता पार्टीने निर्णय केला आहे की, early detection आणि early treatment  या दोन गोष्टींवर  काम करायचं.

 early detection मध्ये काल एक फिरती  लॅब सुरू करण्यात आली आहे.  क्रिकेटपटू हरभजनसिंग याने एक लॅब दिली आहे.  या लॅबला चांगला प्रतिसाद मिळाला तर आणखी एक  लॅब देण्याची तयारी त्याने दर्शवली आहे.  ज्यामध्ये दिवसाला 6000 अॅंटीजेन आणि दीड हजार आरटीपीसीआर चाचण्या घेता येतील. दहा मिनिटांमध्ये अॅंटीजेन आणि सहा तासात आरटीपीसीआर चाचणी होईल. पाचशे रुपयात आरटीपीसीआर चाचणी तर दीडशे रुपयात अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. पिवळे रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी म्हणजेच दारिद्र रेषेखाली असलेल्या नागरिकांना या चाचण्या मोफत असतील असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  सलग दुसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार

early treatment  मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून एक साडेपाचशे बेडचे कोविड  सेंटर कर्वे शिक्षण संस्थेत सुरू करण्यात आले आहे. तसेच आणखी एक 350 बेडचे कोविड सेंटर एसएनडीटी मध्ये सुरू करण्यात आले आहे.  

पाटील पुढे म्हणाले, भाजपनेने निर्णय केला आहे की, शहरात 2000 ऑक्सीजन बेड तयार करायचे ते करताना अगोदरचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना विनंती करून त्यांचा संपूर्ण मेडिकल स्टाफ या ठिकाणी वापरण्यात येईल.  भाजप या ऑक्सीजन बेडस् चा, ऑक्सीजन पायपिंगचा तसेच इतर पायाभूत सुविधांचा खर्च करेल.

आजचे 40 बेड धरून संजीवन रुग्णालयातील ऑक्सीजन बेडची संख्या एकशे दहा झाली आहे.  गरवारे महाविद्यालयात पन्नास बेडसे ऑक्सीजन पायपिंगचे काम सुरू आहे.  तीन दिवसात ते सुरू होईल. विश्रांतवाडी येथील ऑरेंज हॉस्पिटल या ठिकाणी 100 ऑक्सीजन बेडचे काम सुरू आहे. याबरोबरच 10000 रक्ताच्या बाटल्यांचा संकलन करण्याचा संकल्प असून आत्तापर्यंत 17 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून मधून 1200  बाटल्यांचे संकलन झाले आहे, असे पाटील यांनी सांगितले.

अधिक वाचा  साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वाणवा जाणवते: अशा वृत्तींना ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर !’ असा रोखठोक सवाल विचारावयास हवा -शरद पवार

उद्योजक सुधीर मेहता मेहता यांना औरंगाबाद येथे 12 ऑक्सीजनचेचे प्लान्ट असल्याचे समजले.  ते दहा कोटीला मिळतील अशी माहिती मिळाली. मेहता यांनी त्यांचा उद्योजकांचा एक ग्रुप तयार केला.  त्या माध्यमातून दहा कोटी रुपये उभे केले. त्यामुळे हे बारा ऑक्सीजन प्लांट पुण्याला मिळाले आहेत.  त्यातील एक संजीवन हॉस्पिटल, एक दीनानाथ हॉस्पिटल, एक पिंपरी-चिंचवड येथील मौर्य हॉस्पिटल  आणि बाकी इतर हॉस्पिटलला देण्यात येतील.

याशिवाय मनपातील नगरसेवकांना त्यांचा सनिधी  काढा आणि एक कोटीचा एक असा ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’ (हवेतला ऑक्सिजन गोळा करण्याचे यंत्र) असे दोन युनिट घेण्याची सूचना केली. असे दोन युनिट घेतले तर त्यातून दोनशे रुग्णांची ऑक्सिजनची व्यवस्था होईल.  त्यासाठी नगरसेवकांनी प्रत्येकी पाच लाख रुपये जमा करून दोन ऑक्सिजनचे युनिट बुक केली आहेत. तसे महापौरांनी साडेबारा कोटींचा सनिधी कोविडसाठी वर्ग केला आहे. त्यामध्ये स्वतः दीड कोटी व महानगरपालिकेच्या इतर निधीच्या माध्यमातून अशी चार युनिट घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.  

अधिक वाचा  उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपचा भावी सहकारी म्हणून उल्लेख : काय म्हणाले अजित पवार?

 सिंगापूरहून येणार 4000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

सुधीर मेहता यांना सिंगापूर येथे 4000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचे युनिट असल्याचे समजले. त्यांच्या प्रयत्नांतून  हे चार हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचे युनिट 50% रकमेला मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी त्यावरील आयात शुल्क माफ करणे आणि विमानाची व्यवस्था होणे आवश्यक होते.  म्हणून मी स्वतः स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो.  त्यामुळे 24 तासात संपूर्ण देशासाठी एक निर्णय झाला की कोविड संदर्भात कुठलंही साहित्य आयात करायचे असेल तर त्यावरील आयात शुल्क तीन महिन्यासाठी माफ करण्यात येईल तसेच विमानाची व्यवस्था करण्यात येईल त्यामुळे आता 4000 ऑक्सीजन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि अडीचशे वेंटिलेटरची व्यवस्था होणार आहे असे पाटील यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love