देशात धर्मवादाचे विष पसरवले जातेय – मेधा पाटकर

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना समाजामध्ये जातीयवाद, प्रांतवाद  आणि धर्मवादाचे विष पसरवले जात असल्याची टीका जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे केली.

निर्माण संस्था आणि मैत्री नेटवर्कतर्फे आयोजित चौथ्या भटक्या विमुक्त महिला हक्क परिषदेचे  उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पाटकर म्हणाल्या, समाजाच्या बाहेर ठेवणे, परिघाबाहेर ठेवणे, गुन्हेगार ठरवणे, अशा प्रकारचे अन्याय भटके विमुक्तांवर झाले असून, राज्यघटनेतील समता, न्याय, स्वास्वातंत्र्य हे हक्क त्यांना सातत्याने नाकारले गेले. समाजामध्ये वंचित, शोषित, पीडित यांनाजाणीवपूर्वक वगळले असल्याचे दिसते. राज्यघटनेनुसार भटक्या  विमुक्तांना  समान हक्क देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दिसत नाहि. आपल्या हक्कांसाठी दलित, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांना  लढावे लागत आहे. भटक्या विमुक्तांचा लढा हा माणूस म्हणून जगण्यासाठी असायला हवा. हा लढा स्वबळाच्या आधारावर पुढे नेला पाहिजे.

कोणताही गुन्हा घडल्यानंतर पारधी समाजाच्या लोकांना ताब्यात घेतले जाते. त्यामुळे गुन्हेगार जमात असा शिक्का असल्याने त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना अजूनहि आहे. ती काढून टाकणे, हा अस्मितेचा प्रश्न  आहे. भटक्या विमुक्तांना मूलभूत सुविधांपासून दूर ठेवणारा समाज आणि शासन हेच खरे अपराधी आहेत, याकडे लक्ष वेधताना आज धर्मवाद, प्रांतवादाचे विष पसरविले जात आहे. यातtन देशाचा पोत बिघडण्याचा धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *