नाशिक-गेल्या काही महिन्यांपासून आझाद मैदानावर azad ground सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या ST staff आंदोलनाने काल हिंसक वळण घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार sharad pawar यांच्या मुंबईतील सिल्वर ओक silver ok या निवासस्थानावर थेट हल्लाबोल करत दगडफेक आणि चप्पल फेक केली. अचानक कुठलीही कल्पना नसताना किंवा पोलिसांनाही गाफील ठेवीत हे आंदोलन करत आंदोलनकर्ते अचानक कसे घुसले याबाबत अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी सुरू असताना या प्रकाराबद्दल राज्याचे महसूल मंत्री आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात balasaheb thorat यांनी गृहखात्याला home department घरचा आहेर दिला आहे. “पवारांच्या घरावर हल्ला होताना तुमचे कॅमेरे पोहोचतात परंतु आमचे पोलीस पोहोचत नाही, त्यामुळे तुमची यंत्रणा चांगली असे म्हणावे लागेल आणि ही गोष्ट जास्त गंभीरपणे घ्यायला हवी”, असा टोला थोरात यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना लगावला आहे.
थोरात यांचे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील dilip valse patil यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यासारखे असल्याने हा टोला त्यांनी दिलीप वळसे-पाटील यांना लगावला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान ,या प्रकाराचा केवळ सरकारमधील पक्षांनीच नव्हे तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जाहीरपणे निषेध करत झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री असलेले दिलीप वळसे-पाटील यांची खुर्ची डळमळीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काल शरद पवार यांच्या घरावर झाले झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना थोरात म्हणाले शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. विविध प्रश्न सोडवण्यासंदर्भात ते नेहमी पुढाकार घेत असतात. शासनापुढे अनेक अडचणी आहेत एसटीचे विलीनीकरण सध्या शक्य नाही, हे सरकारने वारंवार सांगितले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर जल्लोष साजरा करून पेढे वाटपाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ही अचानक घटना घडली हे अत्यंत दुर्दैवी आहे. एसटी कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला सहानुभूतीच आहे परंतु ,एखाद्या नेत्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचून दगडफेक करणे हे निषेधार्ह आहे. अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना प्रवृत्त करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.