Pushpa naam hai mera, phul nahi fire hum

निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल – अजित पवार

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Ajit Pawar On Amol Kolhe –एकदा चॅलेंज हाती घेतले तर ते मी पूर्ण करतो आणि जिंकूनच दाखवतो ही गोष्ट लक्षात ठेवा. निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल, असा थेट इशारा अजित पवार(Ajit Pawar) यांनी नामोल्लेख टाळून खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना दिला आहे. अजित पवार हे आकुर्डीमध्ये सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (You will know after result)

अजित पवार म्हणाले, “खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना वाटले ते त्यांनी म्हटले. मला जे वाटले ते मी म्हटले. आता तेच कितीदा उगाळून काढणार? “आता बघा, अजित पवार(Ajit Pawar) एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल.” पुढे ते खासदार अमोल कोल्हे यांचा नामोल्लेख टाळून

म्हणाले, “त्या व्यक्तीला  चांगल्या भावनेतून मी पक्षात घेतले. त्यांना खासगीत विचारा की तुम्हाला कुणी पक्षात घेतले. तिकीट देत असताना कोणी शब्द दिला. सर्व गोष्टी इमानदारीने केलेल्या आहेत. निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय मनात आले राजीनामा द्यायचा, ते सातत्याने सांगत होते. कुणी राजीनामा देण्यापासून थांबवले त्यांना विचारा! सहा मतदारसंघात संपर्क ठेवायचा होता तो त्यांनी दुर्दैवाने ठेवला नाही. आता त्यांचं मन त्यांना आतून खात आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *