रोहित पवार यांच्या ईडी चौकशीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक
नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक

पुणे— रोहित पवार यांची कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. अशा बातम्या केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत. याबाबाद माझे रोहित बरोबर बोलणे झालं आहे. त्याला काही नोटीस आलेली नाही.आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली तर आमची सहकार्याची भूमिका राहिली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काही लपवयाची गरज नाही. आम्हा कोणालाही नोटीस आलीच तर आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने वाढवलेल्या इंधन दराव विरोधात राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या आंदोलनाला उपस्थिती लावली तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.

केंद्र सरकार यंत्रणा आणि पैशाच्या जोरावर चुकीच काम करीत आहे. भाजप केंद्रीय यंत्रणा व ईडी यांचा वापर करून महा विकास आघाडी मधील मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात अडकत आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट असून देशासाठी धोक्यांची घंटा आहे. केवळ राजकीय व्यक्तीना केंद्र सरकार नोटिसा पाठवून थांबलं नाही तर पत्रकारांना देखील नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे देशाच संविधान धोक्यात आले आहे, हे केंद्र सरकारच्या कृतीतून दिसत आहे असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.

अधिक वाचा  स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – ४ : जैन आणि बौद्ध परंपरेत अयोध्येचे महत्व

निर्मला सीतारामन यांचे मी बारामतीत स्वागत करीन

भाजपने २०२४  च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघावर आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना घेरण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपने ‘मिशन बारामती हाती घेतलं आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी निर्मला सीतारामन यांच मनापासून स्वागत करते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नडा काय म्हणता एक पार्टी एक देश पण आमच त्याच्या बरोबर विरोधात मत आहे. आमचा पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना नुसार चालणार पक्ष आहे. त्यामुळे एक देश आणि अनेक पक्ष राहिलेच पाहिजे. निर्मला ताई जेव्हा येतील, तेव्हा मी स्वतः स्वागत करेल त्यांनी त्यांचा पक्ष का वाढवू नये. आम्ही आमचा पक्ष वाढवावा. त्यांनी का वाढवू नये? त्यामध्ये गैर काय आहे? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा काय म्हणता एक पार्टी, एक देश पण आमचे त्याच्या उलट आहे.आमचा पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना नुसार चालणारा पक्ष आहे. त्यामुळे एक देश आणि अनेक पक्ष राहिलेच पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा  बिल्कीस बानोला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुक निदर्शने

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवक वसंत मोरे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मनसे जर पाठवत असेल तर त्यांच पण स्वागत करेल मला या मतदार संघावर प्रचंड प्रेम आहे. तसेचं बारामती तर प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. त्याबद्दल जे पाहुणे येतात ते सर्टिफिकेट देत आहेत. त्याबद्दल मला मनापासून आनंद आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महागाई विरोधात शेवटपर्यंत आंदोलन

भाजीपाला ते मेडिकलपर्यत केंद्र सरकारने महागाई करून ठेवली आहे. या महागाईमधून देशातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे. मात्र हे सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. महागाईच्या विरोधात आम्ही आंदोलन करुन या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही अखेरपर्यन्त आंदोलन करीत राहणार असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love