मुंबई-अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सीबीआय कडून तपास सुरु असून या प्रकरणातील सुशांतच्या संबंधातील सर्वांची चौकशी केली जात आहे. चौकशीमध्ये दररोज नवनवीन माहिते समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रिया चक्रवर्तीची सीबीआय कसून चौकशी करीत आहे. शुक्रवार आणि शनिवारीही तीची चौकशी करण्यात आली. रिया व्यतिरिक्त सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचीही जबाब घेण्यात आले. असे सांगितले जात आहे की सीबीआयने आतापर्यंत जे प्रश्न विचारले होते त्याच प्रश्नांची पुनरावृत्ती केली आहे. जेणेकरून कोणाच्या जबाबात फरक आढळून आल्यास आरोपीला सहज पकडता येईल.
या प्रकरणातील समोर आलेल्या ताजी माहितीनुसार आता सीबीआय सुशांतची बहीण मितू सिंग हिचीही चौकशी करणार आहे. सध्या केवळ मितू यांनाच समन्स बजावण्यात आले आहे. कुटुंबातील इतर कोणासही समन्स पाठवण्यात आलेले नाही. त्यानंतर सुशांतची दुसरी बहीण प्रियंका सिंह आणि तिचा नवरा सिद्धार्थ यांचीही चौकशी केली जाईल. तपास पथकाचे त्यांच्या वक्तव्याने समाधान न झाल्यास सुशांतच्या बहिणी आणि रिया, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग, दीपेश यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारले जातील.
वास्तविक, रिया चक्रवर्ती हिने 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले. रिया निघून गेल्यानंतर सुशांतची बहीण मितू त्याच्या घरी राहायला आली आणि 8 जून ते 12 जून या काळात सुशांतबरोबर राहिली. या पाच दिवसात नक्की काय काय घडले याबाबत सीबीआय मीतूकडे चौकशी करेल.
लोक मितूला प्रश्न का विचारात नाही? – रिया
दरम्यान, रिया चक्रवर्तीने मीतू सिंहवर काही प्रश्न उपस्थित करून याबाबत लोक मितूला प्रश्न का विचारात नाही असे म्हटले आहे. रिया महान्ली की, सुशांतच्या सांगण्यावरून मी 8 जून रोजी त्याचे घर सोडले. त्यानंतर त्याची बहीण मीतू तिथेच राहिली. सुशांतने हे का केले किंवा सुशांतचे काय झाले हे लोक मीतूला विचारत नाहीत जर सुशांतची तब्येत खूपच वाईट होती तर तिने त्याला एकटे का सोडले? रिया म्हणाली होती की ‘त्या आठवड्यात त्याला आत्महत्या करावी लागली हे मला समजत नाही.