पुणे– सोलवूड वेंचर्स या पुण्यातील पाच मजली भव्य शोरूममध्ये अनेक नयनरम्य तसेच दर्जेदार सॉलिड वूड म्हणजेच अस्सल लाकडी फर्निचर चे असंख्य पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
बेड्स, डायनिंग टेबल, टी पॉय, आराम खुर्च्या, ड्रेसिंग टेबल्स, वोर्डरोब अशा अनेक मनमोहक वस्तूंची विस्तृत श्रेणी सोलवूड मध्ये पहावयास मिळते. लाकडी फर्निचर साठी वेगळी ओळख असलेल्या काजवे फर्निचर चे सोलवूड व्हेंचर्स हे एकमेव वितरक आहेत.
सर्वोत्कृष्ट क्वालिटी चे अस्सल सॉलिडवूड, फोम, असंख्य प्रकारचे कापड आणि जागतिक दर्जाच्या मशीन्स वर तयार केलेले प्रॉडक्ट्स याठिकाणी उपलब्ध आहेत. चोखंदळ ग्राहकांसाठी सोलवूड मध्ये कस्टमायझेशन अर्थात मेक टू ऑर्डर चा देखील पर्याय इथे उपलब्ध आहे. तर आउटडोर फर्निचर साठी जगभरात नावाजलेल्या नार्डी या इटालियन ब्रँड्सची अतिशय दर्जेदार उत्पादने सोलवूड मध्ये उपलब्ध आहेत.
ग्राहकांना केवळ अस्सल लाकडी आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देताना असंख्य डिझाईनचे पर्याय ही सोलवूड ची खासियत आहे असं किशोर जाधव यांनी सांगितले. पूर्वी एका नामांकित कंपनीत इंजिनिअर असलेले किशोर जाधव, कमर्शिअल आर्टिस्ट असलेले सुनील कोकाटे तसेच स्वतः इंटेरिअर मध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले मंगेश हांडे हे सोलवूड चे प्रवर्तक आहेत.