14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा गळा चिरून खून


पुणे- पुण्यातील बिबवेवाडी भागातील यश लॉन्स येथे १४ वर्षीय मुलीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला आहे. क्षितिजा अनंत व्यवहारे (वय १४ रा. व्ही आय टी  कॉलेज अप्पर बिबवेवाडी, पुणे)असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून हा खून झाला असा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी व्यक्त केला आहे.

क्षितिजा ही कब्बडी चा सराव करण्यासाठी बिबवेवाडी भागातील यश लॉन्स परिसरात सरावासाठी इतर मैत्रिणीसोबत आली होती. मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता तीच्याच नात्यातील असलेला मुलगा (नाव हृषीकेश उर्फ शुभम भागवत) हा त्याच्या तीन साथीदारांसह येऊन तिच्याशी बोलत होता. त्यानंतर वाद होऊन त्याने तिच्या इतर मैत्रीणी समोरच त्यांना कोयत्या हत्यारचा धाक दाखवत तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने गळा चिरला. त्यामुळे क्षितिजा जागेवरच कोसळून गत प्राण झाली.

अधिक वाचा  सिंहगडावर ई-बसला अपघात : मोठा अनर्थ टळला : आठवडाभरात तिसरी घटना

आरोपीने तिचा गळयावर जोरदार वार केल्याने तिचे मुंडके धडापासून वेगळे झाले. घटने नंतर आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. एकतर्फी प्रेमातून हा खून झाला असा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी व्यक्त केला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love