Shivraj Singh Chouhan to be National President of BJP?

शिवराज सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

राजकारण राष्ट्रीय
Spread the love

Shivraj Singh Chouhan : मध्यप्रदेशमध्ये (Madhya pradesh) भाजपला (bjp) दणदणीत विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाच्या वतीने मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर लगेचच चर्चा सुरू झाली की, आता माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan ) यांचे काय होणार? शिवराज सिंह चौहान केंद्रामध्ये कृषी मंत्री (Agriculture Minister) होणार, लोकसभा लढविणार की पक्ष संघटनेचे काम करणार?, त्यांच्यासाठी नक्की काय पर्याय आहेत? अशा अनेक शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या. (Shivraj Singh Chouhan to be National President of BJP?)

खरेतर मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव(Mohan Yadav) यांची निवड झाल्यानंतर शिवराज सिंह (Shivraj Singh) यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, “पक्षाकडे काही मागण्यापेक्षा मी मरणे पसंत करेल. कारण, मला पक्षाने सर्व काही दिले आहे. आता पक्षाला काहीतरी देण्याची माझी वेळ आहे.” शिवराज सिंह यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले. अशातच शिवराज सिंह हे शेतात ट्रॅक्टर चालवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चर्चांना अधिकच उधाण आले.  शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून शिवराज सिंह यांना काही मेसेज द्यायचा आहे का? अशीही चर्चा सुरू झाली. पक्षाकडून काहीतरी मागायचे हे त्यांनी सुरुवातीलाच नाकारले होते.  मात्र त्यांना दिल्लीला जो मेसेज पोहोचवायचा तो मेसेज बरोबर पोहोचला आहे असेच म्हणावे लागेल.

कारणही तसेच आहे. शिवराज सिंह यांना गेल्या सोमवारी पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. p. Nadda) यांनी दिल्लीला बोलावून घेतले होते. त्यांनी त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळ चर्चाही केली. या भेटीमध्ये शिवराज सिंह (Shivraj  Singh Chouhan ) यांच्या, पुढील भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे समजते. या चर्चेनंतर शिवराज सिंह केंद्रीय कृषिमंत्री होणार अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली.  कारण, केंद्रीय कृषिमंत्री असलेले नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar)  यांनी विधानसभा लढवली आणि ते जिंकले सुद्धा. त्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांची निवड झाल्यानंतर तोमर यांचे नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.

शिवराज सिंह यांची आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची निवडणुकीदरम्यान ग्वाल्हेर येथे चर्चा झाली होती. आता दिल्लीतही नड्डा यांनी यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. शिवराज सिंह, नड्डा यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर त्यांच्या देहबोलीमध्ये खूप बदल जाणवला. सूत्रांच्या हवाल्यानुसार शिवराज सिंह यांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. याबाबत त्यांना कल्पना देण्यात आली आहे.  परंतु, शिवराज सिंह यांना बाहेर आल्यानंतर जबाबदारी बाबत विचारले असता त्यांनी बोलणे टाळले. हाय कमांड जी जबाबदारी देतील ती ते  निभावतील असे त्यांनी सांगितले.

समजा शिवराज सिंह यांची केंद्रीय कृषिमंत्रीपदी वर्णी लागली नाही तर त्यांची पक्षात काय भूमिका असेल? याबाबतही तर्क वितर्क लढवले जात आहेत, ते असे. 2018 मध्ये भाजपच्या पराभवानंतर त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता जे. पी. नड्डा यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ती अशी. भाजपचा मागील दोन लोकसभा निवडणुकीचा पॅटर्न बघितला तर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर असलेल्या नेत्याला केंद्राचे गृहमंत्री पद मिळाले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर तेव्हाचे पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांना गृहमंत्री पद देण्यात आले होते. 2019 च्या निवडणुकीमध्ये अमित शहा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते . त्यांना सरकारमध्ये गृहमंत्री पद देण्यात आले आणि  हाच पॅटर्न जर पुढे चालू राहिला तर 2024 मध्ये भाजप केंद्रात सत्तेत आल्यास आत्ताचे पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे गृहमंत्री पदासाठीचे दावेदार असतील. अशावेळी पक्ष संघटनेपासून ते सरकार पर्यंत असा सर्वांगीण अनुभव असलेल्या शिवराज सिंह यांची पक्षाच्या  अध्यक्ष पदावर वर्णी लागू शकते. परंतु, त्यामध्ये थोडा अडथळा वाटतो तो या गोष्टीचा की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांबरोबर शिवराज सिंह यांचे पाहिजे तसे ‘ट्युनिंग’ नसल्याचे बोलले जाते.  अशा स्थितीमध्ये शिवराज सिंह यांचे काय होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे काळच देईल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *