Shriram Temple Ayodhya

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सोनिया गांधी आणि खरगे यांना निमंत्रण

राष्ट्रीय
Spread the love

Ayodhya Ram Temple ‘pran pratishtha’ : अयोध्या(Ayodhya) येथे येत्या 22 जानेवारी होणाऱ्या श्रीराम मंदिरातील (Shriram Mandir) प्रभू श्रीरामांच्या(Shriram) रामलला स्वरूपातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे(Mallikarjun Kharge), काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी(Soniya Gandhi) आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी (Adhir Ranjan Choudhari) iआदींना श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या Shri Ram Janmabhoomi Tirthkshetra Trust) संतांच्या बरोबरच देशातील विविध क्षेत्रात देशाच्या सन्मानासाठी योगदान देणाऱ्या प्रमुख व्यक्तींनाही निमंत्रण देण्यात आले आहे. विविध संप्रदायाचे सुमारे 4000 संत या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच या सोहळ्यासाठी अयोध्येतील प्रत्येक घराला आमंत्रित करण्यात येत आहे, यासाठी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (rss) आणि विश्व हिंदू परिषदचे (vhp) कार्यकर्ते घराघरांमध्ये जाऊन संपर्क करणार आहेत. यासाठी 500 गट स्थापन करण्यात आले आहे

दिनांक 22 जानेवारी रोजी आयोध्या येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.  या सोहळ्यासाठी रामनगरीच्या आसपासचे सर्व रेल्वे स्टेशन सजवले जात आहेत. सोहळ्यासाठी देशातील  विविध स्थानावरून एक हजार विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वे 19 जानेवारीला आयोध्येकडे  रवाना होतील. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकत्ता, नागपूर, जम्मू, पंजाब, हरियाणा इत्यादी ठिकाणावरून या रेल्वे अयोध्या मध्ये येणार आहेत.

रामनगरी आयोध्येमध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. एका अहवालानुसार देशाच्या विभिन्न भागातून अयोध्येमध्ये रोज साधारण पन्नास हजार भावीक दाखल होत आहेत.  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर ही संख्या तीन पट वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *