#Raj Thackeray : मराठा-ओबीसी वाद घडवला जातोय : नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर  राज ठाकरेंचे फटकारे


#Raj Thackeray  : मराठा(Maratha), ओबीसींसह (obc) समाजा-समाजातील वाद हे घडवले जात आहेत. महाराष्ट्र(Maharashtra) एकसंध राहू नये, यासाठीच काही राजकीय पक्ष (Political Party), वाहिन्या (Channels)  व इतर मंडळी काम करीत आहेत. एकेकाळी राज्यकर्ता असलेला मराठी समाज  एकमेकांमध्ये भांडत बसला असून,  महाराष्ट्राचा भूगोलही अलगद काबीज केला जात आहे. मात्र, त्याकडे कुणाचे लक्षच नाही, असे फटकारे मनसेचे(mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी रविवारी नाट्य संमेलनात ओढले. (Maratha-OBC controversy is being created)

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आयोजित ‘नाटक आणि मी’ याविषयावरील मुलाखतीत ते बोलत होते. दीपक करंजीकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.

ठाकरे म्हणाले, केवळ सुशिक्षित असून चालत नाही; तर सूज्ञपणा हवा. आज सूज्ञ लोकांची महाराष्ट्राला सर्वाधिक गरज आहे.  त्या दृष्टीने मध्यमवर्गीयांनी राजकारण, समाजकारण व संस्थामध्ये आले पाहिले. मात्र, या स्तरावर सध्या महाराष्ट्र चाचपडतो आहे. दिशादर्शक महाराष्ट्रासाठी ही स्थिती योग्य नाही.

अधिक वाचा  अभाविपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रा. निर्भयकुमार विसपुते (सांगली) तर अॅड. अनिल ठोंबरे (पुणे) यांची प्रदेश मंत्री म्हणून फेरनिवड

मराठा, ओबीसी हे वाद घडवले जात आहेत. मुळात महाराष्ट्र एकसंध राहू नये, यासाठी काही राजकीय पक्ष, वाहिन्या व इतर मंडळी काम करीत आहे. या सर्वाचे जनतेलाही भान दिसत नाही. म्हणूनच सर्वांनी महाराष्ट्राचा इतिहास एकदा समजून घ्यावा.  ग्रंथ, पुस्तके वाचावीत.

मराठी कलासृष्टीवर बोलताना ते म्हणाले, कलाकारांनी एकमेकांना मान द्यावा. टोपण नावाने लोकांसमोर हाका मारू नयेत. दक्षिणेतील कलाकार परस्परांना सर नावाने संबोधतात. आपण तो आदर्श घ्यावा.  पवार मंचावर आले, तर मी त्यांना वाकून नमस्कारच करेन. ही आपली संस्कृतीच आहे. यापुढे तरी एकमेकांना सन्मान देण्याची कलाकारांनी शपथ घ्यावी.

नाटकाबद्दल कुतूहल

चित्रपट हे माध्यम मला चांगले समजते. पण नाटकाबद्दल मला अधिक कुतूहल आहे. एका चौकानात हे कसे बसविले जाते, असा प्रश्न मला पडतो. नाटक हे त्या अर्थी सर्वात अवघड माध्यम आहे, नाटकात रिटेक नसतो, असे सांगत कलावंतांबद्दलच्या माझ्या जाणिवा जाग्या असतात. म्हणून कलावंत कदाचित अडचणीत माझ्याकडे येत असतील. मला पाहूया, करूया, या गोष्टी आवडत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा  उंच भरारी घेतलेल्या महिलांच्या गौरवार्थ सांगवीत साकारला 380 फूट माहितीफलक

महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत

दोन तासात मुंबईतून अहमदाबादला बुलेट ट्रेन जाणार म्हणे. पण केवळ ढोकळा खाण्यासाठी एक लाख कोटी घालवायचे कशाला? भूगोल म्हणजे जमीन. भूगोल काबीज करण्याकरिता लढाया होतात. आज आपला भूगोल अडचणीत आहे.  येथील जमीन चलाखीने विकत घेतली जात आहे. मात्र, आपण जातीपातीवरून लढण्यात मश्गुल झाल्याने हे सगळे विषय मागे पडत चालले आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली.

नाट्यक्षेत्रासाठी पुढाकार घ्यायला तयार

आपली जी बलस्थाने आहेत,  त्यात नाट्यक्षेत्र येते. मात्र, त्यातही भांडणे होतात. नाट्य क्षेत्रासाठी मी पुढाकार घेतो. चला आपण नाट्य क्षेत्र मोठे करू. मला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

सेन्सॉरशिप नकोच

चित्रपटात विषय कोणतेही येवोत, मी कधी विरोध केला नाही, करणार नाही. खरेतर या आधी आलेल्या चित्रपटात मला विलनच दाखविले गेले. पण हरकत नाही. काही असो. नाटकांसाठी सेन्सॉरशिप नकोच. त्याचा काही उपयोग नाही, असे मतही त्यांनी नोंदविले.

अधिक वाचा  एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही : अजित पवारांनी सुनावले

मॉनिटर यायच्या आत मोकळे करा : फडणवीसांवर मिश्कील टिप्पणी

राज यांनी आपल्या मुलाखतीत प्रश्नांना हजरजबाबी उत्तरे देत हास्याचे फवारेही उडविले. माझ्या मुलाखतीचा विषय मी आणि माझी नाटके, असा हवा होता, असे त्यांनी म्हणताच एकच हशा पिकला. मॉनिटर यायच्या आत मला मोकळे करा, ही त्यांची मिश्कील टिप्पणीही दाद मिळवून गेली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love