Parliament Attack | Parliament Security Breach

संसदेच्या सुरक्षेचे तीन तेरा : संसदेच्या बाहेरील गोंधळाचे महाराष्ट्र कनेक्शन

राष्ट्रीय
Spread the love

Parliament Attack | Parliament  Security Breach -देशाच्या संसदेवर झालेल्या हल्याला (13 डिसेंबर) 22 वर्षे पूर्ण होत असतानाच आज पुन्हा संसदेच्या सुरक्षेचे (Parliament  Security ) तीन तेरा वाजल्याचे समोर आले आहे. संसदेच्या सुरक्षेच्या अक्षम्य चुकीमुळे बुधवारी दोन तरुणांनी थेट संसदेच्या प्रेक्षागृहातून थेट खासदार बसतात त्या टेबलवरून उड्या मारल्या आणि स्मोक कॅन्डल(Smoke Candle) सुद्धा जाळल्या. त्यामुळे संपूर्ण संसद भवनात पिवळा धूर पसरला आणि एकच गोंधळ निर्माण झाला. त्याचदरम्यान संसद भवनाबाहेरही कलर स्मोक कॅन्डल (Colour Smoke Candle) अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आलं.  दरम्यान, या हल्ल्याचे महाराष्ट्र कनेक्शन (Maharashtra Connection) समोर आल्याने नागपूर (Nagpur)  येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही(Winter session) त्याचे पडसाद उमटले.

बुधवारी संसदेचं कामकाज सुरू असताना संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरूण खांबाच्या सहाय्याने  संसदेत उतरले आणि लक्ष वेधण्यासाठी त्यांनी स्मोक कॅंडल जाळले. यातल्या एकाचं नाव सागर शर्मा तर दुसऱ्याचं नाव मनोरंजन आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांची गुप्तचर संस्थांकडून चौकशी सुरू आहे. तर इतर दोघांनी संसदेच्या आवारात निदर्शन केली. त्यांनी स्मोक कँडलमधून (Smoke Candle) धूर सोडला. यातल्या एकाच नाव अमोल शिंदे (Amol Shinde) असं असून तो लातूरचा रहिवासी आहे, तर तरूणीचं नाव नीलम कौर सिंग (Nilam kaur sing) आहे.

वचा रहिवासी आहे. अमोल धनराज शिंदे  (वय 25) हा बारावी पास आहे.  तो सध्या नोकरीच्या शोधात होता. त्याची घरची आर्थिक परिस्थिति बेताची असून अमोलचे आई वडील मजूरी करतात. अमोल शिंदे हा लष्कर आणी पोलीस भरतीची तयारी करत होता. 9 तारखेला भरतीसाठी जात असल्याचे सांगून तो गेला होता. पण दिल्लीला कसा पोहोचला याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याचा एक भाऊ पनवेलमध्ये रिक्षा चालवतो तर त्याचे आई-वडील शेतात मजुरी करतात.

महिला आरोपी नीलम कौर सिंगचीही (Nilam Kaur Sing) माहिती समोर आली आहे. ती हरियनातील हिस्सारची (Hissar) रहिवासी आहे.ती डाव्या विचारसरणीची असल्याचे सांगितले जात आहे. तिच्या वडिलांचे मिठाईचे दुकान देखील असल्याचे माहिती आहे. दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनात देखील निलम सक्रिय होती आणि हरियाणा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान हे चौघही एकमेकांच्या अनेक काळापासून संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.  लोकसभेत घुसखोरी  करणाऱ्या तरुणाला खासदार कोटक यांनी पकडलं.  खासदार कोटक (Kotak) यांनी सर्वप्रथम सागर शर्मा या घुसखोराला  पकडला आणि त्यानंतर त्याला सुरक्षारक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही घुसखोर प्रेक्षक गॅलरीतून थेट लोकसभेत जिथे सगळे खासदार असतात त्यांनी पुढे जात आणि याच वेळ अचानक त्यांनी स्मोक कॅन्डल सुद्धा जाळल्या. त्यातून निघणारा धूर विषारी आहे का? याबद्दल कुठलीही कल्पना नसताना खासदार कोटक यांनी या घुसखोराला पकडले. दोघा घुसखोरांना खासदारांनी चांगलाच चोप देत सुरक्षकांच्या ताब्यात दिले.

संसदेत घुसखोरी करणारे तरूण ज्या खासदाराच्या पासेसवर प्रेक्षक गॅलरीत बसले होते, ते खासदार प्रताप सिन्हा (Pratap Sinha)  कर्नाटकातील (Karnatak) म्हैसूरचे(Mhaisur) खासदार आहेत. चौकशी केली जातीय. आरोपींना पासेस देण्यासाठी कुणी शिफारस केली याचीही चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांनी आपल्यासोबत कोणतेही फोन किंवा ओळखपत्र जवळ ठेवली नव्हती अशी माहितीही समोर आली आहे. .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *