शिवसेनेच्या त्या बंडखोर 16 आमदारांचे निलंबन होणारच?


मुंबई -शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत बंडखोर आमदारांसह गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. आता शिंदे गटाकडून त्यांच्याकडे 50 आमदार असल्याचा दावा केला जात असून दोंन  तृतीयांशापेक्षा जास्त आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. मात्र, असे असले तरी कायद्याच्या चौकटीत हे शक्य नसून 16 आमदारांचे निलंबन होणारच असा दावा महाविकास आघाडीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे वकील देवदत्त कामत  यांनी म्हटले आहे. त्यामुळे नक्की काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेने शिंदे गटाचे 16 आमदार निलंबित करण्याचं पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिलं आहे. जे आमदार आपल्याकडे परत येणार नाहीत अशी ठाम खात्री आहे, अशा 16 आमदारांची नावं या यादीत दिल्याची माहिती आहे. जर हे 16 आमदार निलंबित झाले तर फ्लोअर टेस्टच्या वेळी गणित काय असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

अधिक वाचा  डेटिंग साठी मुलगी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७९ वर्षीय जेष्ठ व्यक्तीची १७ लाखांची फसवणूक

यासाठी शिवसेनेने कायदेशीर मार्ग पत्करला आहे. दरम्यान, रविवारी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांच्या समवेत बातचीत केल्यानंतर प्रसार मध्यमानशी बोलताना 16 आमदार निलंबित होणारच असे ठामपणे सांगितले.

याबाबतची कायदेशीर बाब स्पष्ट करताना अॅड. देवदत्त कामत म्हणाले, ‘दोन तृतीयांश आमदार आहेत म्हणून निलंबन होत नाही. हा मुद्दा चुकीचा आहे. जोपर्यंत दुसऱ्या पक्षात हा गट विलीन होत नाही, तोपर्यंत निलंबन कायदा लागू असतो. त्यामुळे निलंबन नोटीशीला बंडखोर आमदारांना उत्तर द्यावे लागेल. तसेच विधानसभा उपाध्यक्षांनाही कारवाईचे संपूर्ण अधिकार आहेत असे कामत यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत हे 16 आमदार?

१. एकनाथ शिंदे

२.प्रकाश सुर्वे

३. तानाजी सावंत

अधिक वाचा  इंडियनऑईलकडून प्लॅटिनम फ्लीट ग्राहकांशी संवाद :पर्यावरणास अनुकूल इंधनाच्या वापराला प्रोत्साहन

४.महेश शिंदे

५.अब्दुल सत्तार

६.संदीप भुमरे

७.भारत गोगावले

८. संजय शिरसाट

९. यामिनी जाधव

१०. अनिल बाबर

११. बालाजी कल्याणकर

१२. लता चौधरी

१३. चिमनराव पाटील

१४. संजय रायमुलकर

१५. लता सोनावणे

१६. बालाजी किणीकर

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love