नवा ट्विस्ट : एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा : बंडखोर आमदारांचा आग्रह : 2-3 दिवसांत भाजपच सरकार येणार- रावसाहेब दानवे

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर दररोज आणि क्षणक्षणाला नवनवीन घडामोडी घडत आहेत. गुवाहाटीला असलेल्या 50 बंडखोर आमदारांनी आता नवीन मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा असा आग्रह या बंडखोर आमदारांनी केल्यामुळे आता सत्ताकारणाच्या प्रकरणाला नवीन ट्विस्ट मिळाला आहे. तर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 2-3 दिवसांत भाजपच सरकार येणार असे सूचक वक्तव्य केले आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंड करून गुवाहाटी येथे गेलेल्या बंडखोर आमदारांच्या आज झालेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे असा आग्रह केला आहे. दरम्यान, मंत्री उदय सामंत हेही गुवाहाटीला रवाना झालेले आहेत. ते लवकरच गुवाहाटीत दाखल होत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपकडून काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. मात्र, आज एका कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. खासदाराला खासदारचा, आमदाराला आमदाराचा, पालकमंत्र्यांना पालक मंत्र्याचा मान द्या, ही आमच्या पोटातील खदखद आम्ही सांगतो आहे. उद्घाटनांच्या पत्रिकेत नावच नसते. प्रोटोकॉल समजत नाही का? असे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निर्देश करीत दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला सुनावले. ही पद्धत मोडून काढा. सरकार येतील सरकार जातील , सरकारच्या बाबतीतही आमचं काही म्हणणं नाही. उलट आम्हाला तर चांगल आहे. विरोधी पक्षात असलं तर अस बोलायला मिळतं. 2-3 दिवसांनी हेही बंद होणार आहे असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *