राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर बाब;शिवसेनेने आत्मचिंतन करावे-देवेंद्र फडणवीस

राजकारण
Spread the love

News24Pune(ऑनलाईन टीम)-विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपचा धोबीपछाड करीत सहापैकी पाच जागावर विजय मिळवला आहे. भाजपला फक्त धुळे-नंदुरबारच्या जागेवर समाधान मानावे लागले असताना भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, शिवसेनेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या शिवसेनेला एकही जागा न मिळणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पुणे, नागपूर, औरंगाबाद यांसारख्या प्रतिष्ठेच्या जागांवार भाजपचा जोरदार पराभव करत या जागांवर विजय मिळवला आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपचा एकतरी उमेदवार विजयी झाला. तीन पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढल्याने त्यांच्या एकत्रित शक्तीचा आम्हाला अंदाज आला नाही हे खरे असले तरी तीन पक्ष एकत्र आल्याचा फायदा दोनच पक्षांना झाला. शिवसेनेच्या हाताला काहीच लागले नाही. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना एकही जागा न मिळणे ही गंभीर बाब असून त्याचे शिवसेनेने आत्मचिंतन करावे असा सल्ला फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिला.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *