#Disqualification of MLAs : 16 आमदारांचे अपात्रता प्रकरण : अमित शहा आणि एकनाथ शिंदेंची गुप्त भेट : विधानसभा अध्यक्षांच्या या निकालामुळे शिंदे सरकार वाचणार?

Secret meeting of Amit Shah and Eknath Shinde
Secret meeting of Amit Shah and Eknath Shinde

Disqualification of MLAs : – शिवसेनेच्या (Shivsena) 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल ( Disqualification of MLAs ) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar)  10 जानेवारीला देणार आहेत. या निकालाकडे शिवसेना (ठाकरे गट) Shivsena (Thackearay Group) आणि शिंदे गट (Shinde Group)  यांच्यासह राज्यच नव्हे तर देशातही राजकीय वर्तुळाचे (Politicle Circle)  लक्ष लागले आहे. दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल राहुल नार्वेकर(Rahul Narvekar)  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde)  यांची ‘वर्षा’ निवासस्थानी (Varsha Bunglow) जाऊन भेट घेतली. या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. असे असतानाच देशाचे गृहमंत्री अमित शहा(Amit Shah)  हे मुंबईत खासगी कामासाठी(Private Work0  आले असताना त्यांनी रविवारी (दि. 7 जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अमित शहा (Amit शाह)  यांनी सरकार कसे वाचवायचे याचा कानमंत्र नक्कीच शिंदेंना दिला असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (विधानसभा अध्यक्षांच्या या निकालामुळे शिंदे सरकार वाचणार? )

अधिक वाचा  अदानी आणि अंबानींसाठी शेती कृषी क्षेत्र खुलं करण्याचा केंद्र सरकारचा डाव-राजू शेट्टी

मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.

दरम्यान, आज निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहे. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. शिवसेनेतल्या आमदार अपात्रतेवर चार महिने सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 10 जानेवारीला महत्त्वाचा निकाल देणार आहेत.. त्यामुळे नार्वेकरांचा काय फैसला येणार? आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांचा निकाल तयार असल्याचीही माहिती आहे. या निकालपत्राच्या मसुद्यावर दिल्लीतील कायदेतज्ज्ञांचाही अभिप्राय घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी 7 जानेवारीला वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीकाही करण्यात आली आहे.

अधिक वाचा  #मुळखावेगळी ती : विशेष मुलांसाठी संवाद शाळा चालविणाऱ्या परमेश्वरीताई

या निकालाबाबत अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. राहुल नार्वेकर राजीनामा देतील आणि सर्वोच्च न्यायालयावर निकालाचा निर्णय सोडून देतील असा एक मतप्रवाह राजकीय वर्तुळात आहे. तर निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार असल्याचा दूसरा मतप्रवाह आहे. त्याला कारण एकनाथ शिंदे यांनी पुढील 8 महीने मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे केलेल सूचक वक्तव्य.

दुसरे सगळ्यात महत्वाचे म्हणजे. जर हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर शिंदे गटालाच नव्हे तर भाजपलाही धोकादायक ठरू शकते कारण अवघ्या काही दिवसांवर लोकसभेच्या आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास भाजपच्या प्रतिमेला त्यामुळे धक्का बसेल. शिंदे सरकार अस्थिर होऊन त्याचा तोटा महायुतीला होऊ शकतो. तसेच आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) यांची प्रचंड कोंडी होऊ शकते.

अधिक वाचा  कोथरूडमध्ये ठाकरेंची सभा घेण्यास कॉँग्रेसचाच विरोध? : महाविकास आघाडीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप हा कायद्याच्या कसोटीवर टिकाणारा नाही असा निकाल कदाचित दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालामुळे शिंदे सरकार वाचले जाईल. कारण विधानसभा अध्यक्षांनी असा निकाल दिला तर तो शिवसेनेच्या (शिंदे गट) बाजूने असेल. त्या निकालावर दाद मागण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) हे सर्वोच्च न्यायालयात जातील. त्यामुळे, शिंदे सरकार कोसळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सहा महीने सहज निघून जातील. त्यादरम्यान,लोकसभा निवडणुका लागलेल्या असतील आणि त्यानंतर  विधानसभेच्या निवडणुका लागतील. त्यामुळे पुढील आठ महीने एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रिपदी राहू शकतात, असा तर्कही राजकीय वर्तुळात वर्तविला जात आहे.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love