मैलापाणी शुद्धीकरणासाठी अमित राऊत यांच्या कल्पनेतून साकारलेल्या प्रकल्पाचे राज ठाकरेंकडून कौतुक


पुणे : मैलापाणी शुद्धीकरणासाठी नियोजित असलेले जायका सारखे मोठे प्रकल्प किंबहुना सध्या कार्यरत असलेल्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांना, आणखी एक पर्याय बाणेर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित राऊत या युवा कार्यकर्त्यांने प्रकल्प प्रतिकृतीतून (प्रोजेक्ट प्रेझेंटेशन द्वारे) सादर केला आहे. ‘मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ‘ व त्यातून बाहेर पडलेल्या पाण्याचा वापर आपण कशारीतीने करू शकतो, याचा आढावाच या प्रकल्प प्रतिकृतीत देखाव्याच्या स्वरूपात दाखविण्यात आला आहे.                   

 महापालिकेकडून पुरविण्यात येणारे शुद्ध पाणी वापरून झाल्यावर ते सरळ नदी मध्ये न सोडता त्यावर प्रक्रिया करून सोडल्यास, नद्या, नाले स्वछ राहू शकतात. व पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळू शकते. तसेच नदीचे प्रदूषण न होता, मैल्यातून मिथेन, खत, गॅस निर्मिती होऊ शकते निर्मिती कशा प्रकारे होऊ शकते याची प्रतिकृती चल दखाव्यातून तयार करून, त्याद्वारे उत्तम असे सादरीकरण राऊत यांनी केले आहे. मनसे ‘ब्लू प्रिंट’ला साजेसा असा हा प्रकल्प सोसायटी स्तरापासून, झोपडपट्टी स्तरावर, मोठमोठ्या टाऊन शिपमध्ये तथा शहर पातळीवरही  अंमलात येऊ शकतो.    

अधिक वाचा  ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह १४ जणांवर मोक्का : ललित पाटील कडून आणखी ५ किलो सोने जप्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘ब्लू प्रिंट’ला अनुसरून तयार केलेल्या या प्रकल्पाचे सादरीकरण शनिवारी ( दि. १३ मार्च )  पुण्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर अमित राऊत यांनी केले. तेव्हा हे सादरीकरण महानगरपालिका आयुक्तांनाही दाखवावे आशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्यासह बाबू वागस्कर, किशोर शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love