सावरकर समजून घेताना : भाग ४ वि. दा. सावरकर : एक सेक्युलर नेतृत्व


खरं तर हा विषय पाहून काहींच्या भुवया उंचावल्या असतील, प्रखरपणे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणारे सावरकरहेसेक्युलर कसे काय असू शकतात?असा प्रश्न पडणे साहजिक आहे.

परंतु त्याकाळी आणि प्रस्तुत काळी सुद्धा, जे काही थोडेपार खऱ्या अर्थाने सेक्युलर नेतृत्व या देशात होऊन गेले, त्यापैकी वि. दा. सावरकर हे सेक्युलॅरिझमची टोकाची भूमिका मांडणारे अग्रणी होते हे सत्य आहे.

या विषयास प्रारंभ करताना सर्वप्रथम सेक्युलॅरिझम म्हणजे काय ? हे समजून घेणे गरजेचे आहे.

◆ सेक्युलॅरिझम म्हणजे नेमके काय ? असा प्रश्न विचारल्यानंतर बहुतेक उत्तरांची सुरुवात ही“माझ्या मते …” अशीच होताना दिसते पण, कोणाच्या मते सेक्युलॅरिझम अर्थ अमुक आहे, किंवा कोणाच्या मते सेक्युलॅरिझमचा अर्थ तमुक असे म्हणणे हे सर्वत: चुकीचे आहे. प्रत्येक भारतीयाला अभिप्रेत असणारा सेक्युलॅरिझमचा अर्थ किंवा व्याख्या ही एकच असून तो अर्थ किंवा ती व्याख्या संविधानानुसार ठरलेल्या मार्गदर्शकतत्वांचीच आहे. संविधानानुसार सेक्युलॅरिझमचा अर्थ निधर्मी किंवा धर्मनिरपेक्ष असा आहे.

सेक्युलर शब्द प्रस्तावनेत घातल्यानंतरच हा देश किंवा संविधान धर्मनिरपेक्ष झाले हा गैरसमज आहे. प्रस्तावनेमध्ये सेक्युलर या शब्दाचा समावेश होण्यापूर्वी सेक्युलॅरिझमचीसंकल्पना ही संविधानात समाविष्ट केलेली होती.

◆ संविधानातील कलम २५ ज्याला सर्वसाधारणपणे ‘धर्मस्वातंत्र्या’चेकलम म्हणले जाते त्या कलमाद्वारे ही संकल्पनाव्यक्त होते.त्या कलमाचा महत्वाचा भाग खाली दिला आहे, वाचकांनी ती कलमे मुळापासून वाचून त्यातून योग्य तो अर्थ घ्यावा.

◆ Right to Freedom of Religion

25. (1) Subject to public order, morality and health and to the other provisions of this Part, all persons are equally entitled to freedom of conscience and the right freely to profess, practise and propagate religion.

अधिक वाचा  सावरकर समजून घेताना -भाग २ वि. दा. सावरकर - माफीवीर की राष्ट्रवीर (उत्तरार्ध):

◆ थोडक्यात, संविधानातील धर्म स्वातंत्र्य हे कायदा-सुव्यवस्था, नीतिमूल्यं, आरोग्य आणि इतरांचे मूलभूत हक्क या चार गोष्टींशी बांधील आहेत.म्हणजेच आपल्या धर्माचे आचरण करत असताना वरील चार बाबींना छेद जाईल असे कोणतेही आचरण करता येणार नाही.

◆ या कायद्यांचे पालन करीत असताना कोणत्याही नागरिकाचा धर्म, हा केवळ पारलौकिक धर्माचे नियम पाळण्याकरता शिल्लक राहतो. इहलोकातील परस्परातील व्यवहाराकरिता कोणत्याही नागरिकांस धार्मिक ग्रंथाचा आधार घेता येत नाही, त्याकरिता संविधानातीलतरतुदी किंवा सोप्या भाषेत कायदे यानुसारच वागावे लागते.यालाच इहवाद, धर्मनिरपेक्षता, निधर्मीपणा म्हणजेच सेक्युलॅरिझम असे म्हणतात. त्यामुळे सेक्युलॅरिझम या व्याख्येमध्ये सर्वधर्मसमभाव, धार्मिक सहिष्णुता, वगैरे कोणत्याही बाबी समाविष्ट होत नाहीत हे अगदी स्पष्ट होते आहे.

◆ आता आपण सावरकरांचा आणि सेक्युलॅरिझमचा काय संबंध आहे ते पाहुयात,

सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की; सावरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक नसून ते सामाजिक आणि राजकीय असे हिंदुत्व आहे. त्याचप्रमाणे ते ऐहिक मूल्यांमध्ये सुधारणा, आचरण करण्याचा वस्तुपाठ देणारे आहे. सावरकरीय हिंदुत्व हे धार्मिक नव्हते एवढेच वाचकांनी ध्यानी ठेवावे.

सावरकर जितके कडवे हिंदुत्ववादी होते तितकेच ते कडवे विज्ञानवादी सुद्धा होते, त्यांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांमधून धर्मचिकित्सा करताना ते लिहितात…

“…धर्माचे राहता राहिले दोन अर्थ; आचार आणि निर्बंध. मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार त्याच्या पारलौकिक जीवनास उपकारक आहेत त्यास आम्ही आचार हा शब्द योजतो… पारलौकिक जीवनासंबंधी अस्तिपक्षी आणि नास्तिपक्षी अजून कोणताही नेमका सिद्धांत मनुष्यास कळला नसल्याने त्याला कोणता ऐहिक व्यवहार उपकारक ठरेल हे निश्चित नाही… बाकी उरला प्रश्न निर्बंधांचा (कायद्याचा) आणि मनुष्या-मनुष्यामधील शिष्टाचाराचा (वागणुकीचा) … ते सदैव परिवर्तनीय होते आणि असले पाहिजेत…”

अधिक वाचा  जात आणि समाज : समज आणि गैरसमज...

◆ याचाच अर्थ, सावरकरांनी ऐहिक जीवनामध्ये परस्परांशी कसे वागावे, आपले इहलोकातील जीवन कसे व्यतीत करावे याचे नियम (धर्मग्रंथानुसार) हे बदलत गेले असले पाहिजेत असे सांगितले आहे. याच निबंधामध्ये सावरकर सांगतात की;

◆ “ मनुष्याचे झाडून सारे ऐहिक व्यवहार, नीती, रीती, निर्बंध हे त्यास या जगात (काळात) हितप्रद आहेत की नाहीत हे  प्रत्यक्षनिष्ठ कसोटीनेच ठरवले पाहिजेत, पाळले पाहिजेत, प्रवर्तिले पाहिजेत,”

आपल्या एका लेखामध्ये सावरकर म्हणतात;

“सर्वच धर्माचे धर्मग्रंथ; हे आता कालबाह्य झालेले आहेत, काल काय घडले एवढेच सांगण्याचा त्यांचा संबंध राहिला आहे, हे ग्रंथ आम्हांसवंदनीय, आदरणीय असले तरी ते सद्यस्थितीमध्ये आचरणीय असतीलच असे नाही. त्यामुळे त्यांना सन्मानाने ग्रंथालयात जपून ठेवावे.”

◆ थोडक्यात, मनुष्यजातीसकालानुरूप जगण्यास, निर्धोकपणे वावरण्यास, परस्पर हितसंबंध जोपासण्यास आणि पर्यायाने एकसंघ राष्ट्र किंवा समाज म्हणून जीवन व्यतीत करण्यास जे उपयुक्त आहेत अश्या नव्या नियमांची, निर्बंधांची अर्थातच “नव्या स्मृतीची” या राष्ट्रास आवश्यकता आहे, हे सावरकरांनी सुमारे ८०-९० वर्षांपूर्वी सांगितले आहे.

◆ सावरकरांना अभिप्रेत नवी स्मृती (कायदे/नियमावली) म्हणजेच संविधान.

अधिक वाचा  ईडा पीडा टळुन पुन्हा परत सर्व मंगल होऊ दे

लोकशाही असणाऱ्या राष्ट्रामध्ये, ऐहिक जीवनामध्ये भारतीयाने परस्पर व्यवहार (वागणूक) कसे असावे याबद्दलचे नियम म्हणजेच, इहलोकातील धर्मग्रंथ हा त्या राष्ट्राचे संविधानच आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.

सर्वप्रकारच्या न्याय निवाड्यांकरिता संविधानातील न्याय व्यवस्था हीच अंतिम असली पाहिजे असेच वाटते.

सावरकरांनी मांडलेला सेक्युलॅरिझम हा किती पराकोटीचा होता याचे उदाहरण द्यायचे झाल्यास; त्यांच्याच लेखातील काही ओळी सांगता येतील;

◆ “एखाद्या धर्मग्रंथामधील चांगली बाब, ही केवळ चांगली आहे म्हणून तिचा स्वीकार करावा, ती धर्म ग्रंथात सांगितली आहे म्हणून नव्हे!”

थोडक्यात, जर एखाद्या धर्मग्रंथांमध्ये “धूम्रपान करू नये” अशी शिकवण असली तरी, धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे म्हणून ते टाळले गेले पाहिजे, धर्मग्रंथात सांगितले आहे म्हणून नव्हे !

आपण जर सावरकरांच्या या भूमिकेचा नीट विचार केला तर हे लक्षात येते की; धर्मस्वातंत्र्याचा होणारा अतिरेक जर टाळायचा असेल तर सावरकरांनी मांडलेला इहवाद, सेक्युलॅरिझम स्वीकारणेहाच योग्य उपायआहे.

ऐहिक जीवनामध्ये धर्मग्रंथावर आधारित नियम न पाळता, सामाजिक परिस्थितीस पोषक असे नियम मानावे असे सांगणारे सावरकर, हे संविधानात सांगितलेल्या गेलेल्या सेक्युलॅरिझमच्या (पुरोगामी) संज्ञेत बसतात की प्रतिगामीत्वाच्या संज्ञेत बसतात हे वाचकांनी स्वतः ठरवावे.

◆ सावरकरांची धर्मचिकित्सा आणि विज्ञानवाद या संबंधी अधिक माहिती घेण्याकरता, सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचावेत.

🚩🚩🚩🚩🚩

श्रीपाद श्रीकांत रामदासी

  प्रवर्तन प्रतिष्ठान पुणे

विश्व संवाद केंद्र, पुणे द्वारा प्रकाशित

आपले अभिप्राय नक्की पाठवा. [email protected]

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love