#चराचरात श्रीराम : ‘भोसला`तील देखणी,सुबक `कोदंडधारी श्रीराम मुर्ती`

महाराष्ट्र लेख
Spread the love

भोसला सैनिकी विद्यालयाचे संस्थापक स्वातंत्र्यवीर व धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांनी १९३५ ते १९३७ या काळात आनंदवल्ली व नाशिक शहराच्या शिवारात १६० एकर जमीन संपादित केली. धर्मवीर डॉ.मुंजे हे निःसीम रामभक्त होते व म्हणून त्यांनी या परिसराचे `रामभूमी` हे नामकरण केले. तसेच येथे सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रभूरामाच्या चरित्राचे अनुकरण करणारे विद्यार्थी `रामदंडी` या नावाने संबोधले. डॉ.मुंजे यांच्यासमोर त्यावेळी विद्यालयाची शाळा,वसतीगृह,भोजनगृह,क्रीडांगणे,रायफल शुटींग यासाठी सुविधा करण्याची प्राथमिकता होती. त्यामुळे श्रीराम मंदीरात प्राथमिकता देता आली नाही….

सन १९८२ मध्ये शिक्षक,पालक व रामदंडी यांच्यातील चर्चेतून कोदंडधारी श्री रामाच्या मंदीराची संकल्पना मांडण्यात आली आणि या तिन्ही घटकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याचवेळी उपस्थितांमधून तीस हजार रूपयांचे योगदान प्राप्त झाले. मंदीराची जागा निश्चित करण्यासाठी बाबासाहेब घटाटे यांच्याशी शिक्षक,पालक,रामदंडीनी चर्चा केल्यावर आज ज्या जागेवर श्री रामंदीर आहे. ती जागा निश्चित करण्यात आली. त्यावेळेचे सरकार्यवाह तात्यासाहेब प्रधान हेही उपस्थित होते. श्री. प्रभू रामाची मुर्ती रामदंडीनी फायर केलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या मेटलपासून निर्माण करावी, अशी कल्पना त्यावेळी मांडण्यात आली. त्यासाठी दादासाहेब रत्नपारखी यांच्याबरोबर काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत वास्तव्यास असलेल्या कामकोटीचे शंकराचार्य यांची भेट घेऊन या कल्पनेस मान्यता मिळाली व त्याचवेळी त्यांनाच मंदीराच्या भूमिपूजनास येण्याचेही आमंत्रण देण्यात आले.

मुर्तीकाराने सेवा, श्रध्देने घडवली मुर्ती

मुंबईचे प्रसिध्द वास्तुतज्ञ शिरीष सुखात्मे यांनी मंदीराची आखणी आपल्या आर्थिक अंदाजपत्रकात बसेल अशी विनामूल्य करून दिली व मंदीर पूर्ण होईपर्यत सतत भेट देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. श्री.प्रभू रामांच्या मूर्तीसाठी तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी अनेक मंदीराना भेटी दिल्या.पण नुसता कोंदडधारी राम भावला नाही म्हणून कल्याणचे प्रसिध्द मुर्तीकार श्री.भाऊ साठे यांच्याकडे सतत प्रयत्न करून कोदंडधारी श्री रामाची मुर्ती करण्याची जबाबदारी सोपवली व त्यांनी अत्यंत श्रध्देने परिपूर्ण केली. त्यासाठी लागणारे शंभर किलो गनमेटल त्यांच्याकडे सूपूर्त केले.

श्री.सुरेंद्रकुमार वधवा यांनी मंदीर उभारण्याची पूर्ण जबाबदारी घेतली व पार पाडली. त्यासाठी लागणारे सिमेंट,लोखंड,विटा व इतर सर्व साहित्य भोसला सैनिकी विद्यालयाने जमा केलेल्या वेगवेगळ्या निधीतून पुरविण्यात आले. अशाप्रकारे पालक,शिक्षक विद्यार्थी व अन्य श्रीराम भक्तांमुळे श्रीराम मदीर उभे राहिले. श्री रामाची मूर्ती पूर्ण झाल्यावर तात्यासाहेब गर्गे व सोरटी सोमनाथ मंदीर निर्मितीत समाविष्ट असणाऱ्या ब्रम्हवृदांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेची तीन दिवस अहोरात्र महापूजा झाली व १० एप्रिल १९८४ ला सकाळी दहावाजता विधीवत प्राणप्रतिष्ठा झाली. या महापूजेस श्री व सौ.नानासाहेब गर्गे यांच्यासमवेत समस्त शिक्षण उपस्थित होते.

खर्चिक कामास श्रध्देने दिला हातभार

मंदीरातील सभामंडल हे मोठे खर्चिक काम होते.त्यासाठी कुणी रामभक्त देणगीदार आवश्यक होता. सुदैवाने श्री.वधवा यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ सुमारे दहा लाख रूपये खर्च करून अत्यंत सुंदर व भक्कम सभामंडप उभा केला. या सभागृहाचे २९ मार्च २००० ला कामकोटीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्याहस्ते झाले. अशाप्रकारे श्रीराम मंदीराचा प्रकल्प पूर्ण झाला. परंतु योजनेप्रमाणे श्रीराम भक्त हनुमानाचे मंदीर बांधून पूर्ण केले. या मंदीरातील बलवान रामभक्त श्री हनुमानाची मुर्ती नाशिक येथील पंचवटीतील लोढे बंधू यांनी वेळेत व प्रभावी तयार करून दिली. यात प्रामुख्याने नाशिक विभागीय समितीचे कार्यवाह दिवाकर कुलकर्णी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. दिवाकर कुलकर्णी यांच्या कल्पनेप्रमाणे अतिशय सुंदर,प्रमाणबध्द व सुबक अशी भारत मातेच्या मुर्तीची स्थापना पण याच मंदीरात ३१ मार्च २००४ मध्ये करण्यात आली.न शिकमध्ये भारत मातेचे एकमेव मंदीर भोसला परिसरात आहे.

आजही नवमीस हजारो रामभक्त दर्शनासाठी येथे दुपारी बारा ते रात्री बारा यावेळेत येथे येतात. भोसला कॅम्पसमधील विविध युनिटचे विद्यार्थीही या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

मुर्तीकारांना राममुर्तीला घातला साष्ट्रांग दंडवत

मुर्तीकार अण्णाभाऊ साठे मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर नाशिकला आले. त्यावेळी त्यांनी मला सगळेच जण बोलवत असतात,पण मी प्रत्येक मुर्तीच्या ठिकाणी जात नाही. पण पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर ते या परिसरात आले.

त्यांना मंदीराचा तो स्वच्छ,हिरवा परिसर,शांतता,शिस्त या सागळ्या वातावरणात मुर्तीची विलोभनियता,प्रसन्नता खूपच खुलून दिसत होती. त्यांनी मुर्तीसमोर साष्ट्रांग दंडवत घातला. कलाकाराने स्वतःच्याच कलाकृतीला दिलेली ती अविस्मरणीय दाद होती, असे म्हणता येईल.

शंकर दयाळ शर्मा एकदा कार्यक्रमानिमित्त सपत्निक रामभूमीत आले होते. त्यांनी श्रीरामाचे दुर्शन घेतले. दोघेही नतमस्तक झाले आणि पायऱ्या उतरतांना त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात बदल केला. ते म्हणाले. `अब कालाराम मंदिर नही जाएंगे`  त्या मंदिराइतकेच पावित्र्य त्यांनी इथे जाणवले. उपस्थितांचे मन भरून गेले.

पायाजवळ एक फुल हमखास सापडणारच

दररोज रात्री मंदीराचा गाभारा स्वच्छ करून निर्माल्य बाहेर काढून मंदीर बंद केले आणि सकाळी पुन्हा उघडले की मुर्तीच्या पायावर एक फूल वाहिलेले सापडते. मंदिराचे पहिले,दुसरे पुजारी आणि अन्य काही व्यक्तींनी याचा शोध घेतला. पण अजून काही समजले नाही. ही मंदिराबद्दल अख्यायिका असावी.

कोंदड हाती घेऊन सतर्क अणारा श्रीराम आसूररूपी राक्षसांचा नायनाट करण्याचा आदर्श तरूण पिढीत निर्माण करतो आहे. मुखात चार वेद आहेत आणि पाठीवर बाणासह हातात धनुष्य आहे म्हणजे ब्रम्हतेज आमि क्षेत्रतेज दोन्ही आहेत असा श्रीराम शाप देऊन किंवा बाणाने दुर्जनांचा नाश करील.

                           अग्रत श्र्चतुरे वेदा: पृष्ठत: सशरं धनु:

                           इदं ब्रम्हं इदं शास्त्रं शापादपि शरदपि!

 श्रीकृष्ण कुलकर्णी, नाशिक

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *