पुणे-पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चंदनाची तस्करी करणाऱ्यास पाठलाग करुन जेरबंद केले. त्याच्या कडून 25 लाख 82 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणात पोलिसांनी सूरज कैलास उबाळे (वय 24 रा.चांदा तालुका-नेवासा जिल्हा अ.नगर) याला अटक केली .
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बातमीदारा मार्फत पोलिसांना बातमी मिळाली की पुणे-नगर रोड एक टेम्पो क्र. एम एच 17 बी डी 2698 हा नगर च्या दिशेने जात असून त्या मधे चंदनाच्या झाडाची लाकडे अवैध्यरित्या घेऊन जात असल्याची खबर मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून शिक्रापुर येथे चाकण चौकात मुद्देमाला सह एकाला जेरबंद केले.
चंदनाची तस्करी छुप्या पद्धतीने केली जात होती, टेम्पो गाड़ीच्या हुडामध्ये एक छुपा कप्पा तयार केला होता. या कप्प्यात गोण्यांमध्ये 190 किलोग्राम वजनाची चंदनाच्या गाभ्याची लाकडे मिळून आली.