पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस मुख्यालयात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न: का केले असे?


पुणे- सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्याशी वाद झाल्याने त्या महिलेले ठाणे अंमलदाराकडे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तक्रार नोंदविली आणि आता नाचक्की होणार या भीतीने ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गार्ड अंमलदाराची बंदुक हिसकावून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात ही घटना घडल्याने खळबळ उडाली. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला.

या कर्मचाऱ्याने गार्ड अंमलदाराची बंदुक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना त्या  दोघांमध्ये झटापट झाली. त्यावेळी ट्रिगर दाबला जाऊन गोळी उडाली. ती गार्डच्या बोटाला लागली.या गार्डला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  व्यावसायिकाचे ईमेल अकाऊंट हॅक करून 4.5 कोटीचा गंडा