डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: पुण्यात आरएसएसतर्फे विविध ठिकाणी अभिवादन; गरजू विद्यार्थ्यांसाठी वही-पेन वाटप उपक्रम

आरएसएस पुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन Slug:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुणे शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. सिंहगड रस्ता येथे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर आणि सिंहगड भाग संघचालक सचिन नागपुरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी भाग कार्यवाह विवेक गद्रे, शरद शिंदे, मंगेश पाटील उपस्थित होते. पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महानगर कार्यवाह सचिन भोसले आणि कसबा भाग संघचालक प्रशांत यादव यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.
संघाच्या सामाजिक समरसता गतिविधीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमांना किशोर मेहता, शरद शिंदे यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते. पद्मावती येथील बुद्धविहारात नगर संघचालक अविनाश धोमकर यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी बुद्धविहाराचे प्रमुख सुनील ओव्हाळ यांनी बुद्धवंदना घेतली.
वडगाव शेरी येथेही समरसता गतिविधीच्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी कृष्णकांत सातव, युवराज पाटील, गोकुळदास परदेशी, उत्तम पाडकोंडे उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात भाग संघचालक सुभाष कदम यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. संघ स्वयंसेवकांनी महानगरासह संपूर्ण प्रांतात अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन केले. प्रांत संघचालक प्रा. नाना जाधव यांनी अहिल्यानगर येथील अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेतला.
– वही-पेन वाटपाचा उपक्रम:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये १२ ते २६ एप्रिल या कालावधीत स्वयंसेवक डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमापूजनाबरोबरच वही-पेन अर्पण करणार आहेत. हे संकलित झालेले साहित्य समरसता गतिविधीच्या माध्यमातून सेवावस्त्यांमधील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. खराडीतील समर्थनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने व्याख्यान आणि वही-पेन वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला.
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  Congress and Shiv Sena UBT alliance for Pune Municipal Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची युती