काश्मीरचा नवा अध्याय: जम्मू – काश्मीरचे अनेक शेतकरी आणि उद्योजकांचे नवनवीन प्रयोग

पुणे-मुंबई राष्ट्रीय
Spread the love

काश्मीरचा नवा अध्याय: जम्मू – काश्मीरचे अनेक शेतकरी आणि उद्योजकांचे नवनवीन प्रयोग

पुणे–गेल्या वर्षी केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक शेतकरी आणि उद्योजक नवनवीन प्रयोग करत असून, त्याला पुणेकरांची देखील साथ मिळत आहे.

पुण्यातील काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला असून, नुकतेच सेंटर फॉर स्ट्रॅटेजीक रिसर्चच्या वतीने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 91 टक्के लोकांनी जम्मू – काश्मीरमधील बदलांचा देशामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल, असे विश्वास व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या शेतकऱ्यांनी पुण्यातील आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने कृषी महाविद्यालय, दूध फॅक्टरी, आधुनिक गोठा या ठिकाणांना भेटी दिल्या होत्या.

यावेळी त्यांनी खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. शेती व्यवसायासाठी उपयुक्त आधुनिक गोष्टींविषयी या दौ-यातून माहिती मिळाली. कलम ३७० च्या निरस्तीकरणाच्या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्याप्रमाणावर उद्योगधंदे सुरु होतील, अशी आशा आहे. कलम ३७० रद्द केल्याने तेथील उद्योगांना चालना मिळेल, तरुणांना रोजगार मिळतील आणि जम्मू-काश्मिरचा विकास होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले होते.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्यातील कलम ३७० च्या निरस्तीकरणाच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर तेथील नागरिक, शेतकरी यांना देशातील इतर भागांशी जोडण्याचे काम सध्या सुरु आहे.

यासंदर्भात बोलताना जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्राचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रा. विनय चाटी म्हणाले की, केंद्र सरकारने कलम 370 आणि 35 (ए) रद्द केल्यामुळे अनेक प्रश्नांनसंदर्भात निर्माण झालेले गैरसमाजाचे धुके नष्ट होईल. काश्मीर संदर्भात प्रकाशित झालेल्या सर्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांनी तेथील बदलांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आशा प्रकारे लोकांनी काश्मीर खोऱ्यातील बदलांवर शिक्केमोर्तब करणे गरजेचे होते. त्याहीपेक्षा काश्मीरमधील लोकांनी या बदलांचे स्वागत करणे गरजेचे होते.

बदल झाल्यानंतर आपण त्या परिसरात प्रवास केलेला आहे. तेथील लोकांनी ही बदलांना सकारत्मक प्रतिसाद दिला आहे, असेही विनय चाटी म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *