पुण्यातील लॉकडाऊनमधील निर्बंध आणखी कडक : जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद राहणार


पुणे—पुण्यामध्ये 1 मे पर्यन्त संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून ‘विकेंड लॉकडाऊन’ला  (शनिवार-रविवार) अत्यावश्यक सेवा तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, पुण्यामध्ये कोरोनाचा वाढता उद्रेक ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. त्यातच लोकांना सांगूनही बाहेर फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता आणखी निर्बंध वाढवण्यात आले असून ‘विकेंड लॉकडाऊन’ला अत्यावेशक सेवेतील दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याला फक्त औषधांच्या दुकानांचा अपवाद असेल. पुण्यात काही व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवत दुकानं सुरु ठेवली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांचा हा आदेश दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहतील, अशी माहिती पुण्याचे सह. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. पुण्यात आता शनिवार आणि रविवारी फक्त मेडिकलची दुकान सुरु ठेवण्यास परवानगी आहे.जे लोक संचारबंदीचे नियम मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

अधिक वाचा  देशातील 40 टक्के प्रदुषणाला माझे वाहतूक खाते जबाबदार - नितीन गडकरी

विकेंड लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच बाहेर फिरता येणार आहे. पण काही लोक अजूनही संभ्रमात असून त्यांना अस वाटतंय की शनिवार, रविवारी विकेंड लॉकडाऊन नसून फक्त कडक संचारबंदी आहे.पुणे शहरात 1 में पर्यंत विकेंड लॉकडाऊन असणार आहे. यात जर कोणीही विनाकारण बाहेर फिरलं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love