राष्ट्रीय विज्ञानदिन विशेष लेख: तर्कशुद्ध भारतीय विज्ञान परंपरा


भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला सर चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो.जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकालात्यांनी आपला निबंध पाठवला आणि १९३० साली त्याला नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख म्हणजेच २८ फेब्रुवारी! म्हणून या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्याद विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी तो साजरा केला जातो.

विज्ञानाच्या विकासाची दोन रूपे मानली जातात. एक म्हणजे शुद्ध विज्ञान आणि दुसरे उपयोजित विज्ञान. शुद्ध विज्ञानात वैश्विक सत्य आणि त्याविषयीचे नियम तर उपयोजित विज्ञानात मानवी जीवन अधिकाधिक सुविधायुक्त कसे होईल व त्या दृष्टीने वापरल्या जाणार्याे विज्ञानाचे नियम जाणून घेतले जातात.

‘एनसायक्लोपिडिया ऑफ ब्रिटानिका’ या पुस्तकात असा उल्लेख आढळतो की, “लॅटिन भाषेत सायंशिया (Scientia) या शब्दाचा अर्थ होतोज्ञान. विज्ञानविषयक ज्ञान विविध प्रकारचे असते.                                 

◆ अणुपासूनब्रह्मांडापर्यंत,नक्षत्रांच्या निर्मितीपासून पक्षांच्या स्थलांतरापर्यंत आणि प्राण्यांच्या हालचालींपासून विचार पद्धतीच्या विविध नियमांचा ज्ञानात समावेश होतो.

आपण हे लक्षात घेतले पाहिजे की पाश्चात्य वैज्ञानिक दृष्टिकोन, धारणा व प्रायोगिक विज्ञानाच्या कक्षेचा प्रारंभ साधारण ४५० वर्षापूर्वी सुरू झाला.युरोपमधील धर्म सत्तेचा विशेषतः चर्चचा विज्ञानात पाशवी हस्तक्षेप होता. ह्या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय वैज्ञानिक दृष्टिकोन कसा होता?  विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे काही योगदान आहे का?विज्ञान व तंत्रज्ञानाबाबत भारतीय दृष्टिकोन काय होता? आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यामध्ये काही वेगळी वैशिष्ट्ये आढळतात का? विकासाबाबत भारतीय विज्ञानाच्या दृष्टिकोनातून काही उत्तरे आहेत का?

अधिक वाचा  तेजतपस्विनी वंदनीय मावशी केळकर

प्रख्यातभारतीय वैज्ञानिक आचार्य पी. सी. रे यांनी म्हटले आहे की, “१६६२ मध्ये प्रायोगिक विज्ञानाकरिता जेव्हा रॉयल सोसायटीची स्थापना झाली त्यावेळीभारतात १३व्या व १४ व्या शतकात लिहिलेली रसायनशास्त्रावरील दोन पुस्तके उपलब्ध होती.एक होते, श्री. रामचंद्र यांनी लिहिलेले ‘रसेंद्र चिंतामणी’आणि दुसरे, श्री. यशोधर यांनी लिहिलेले ‘रसप्रकाश सुधाकर’. रामचंद्र लिहीतात, “यापूर्वीप्रयोगांती सिद्ध केलेल्या संशोधनांचा समावेश या पुस्तकात नाही तर, मी स्वतः प्रयोग करून जे निष्कर्ष मिळाले आहेत तेवढेच यात लिहीले आहेत.”

जारण क्रिया (decaying materials)याविषयी १३ व्या शतकातील यशोधरलिहितात,“जडपदार्थांच्या मदतीने मी माझ्या हातांनी प्रत्यक्ष प्रयोग केले असून त्यातूनच धातूरचना सिद्ध केल्या आहेत.”

◆ विज्ञानातील गणित, कालगणना,पदार्थ विज्ञान,  रसायन शास्त्र, इ. विषयांवर संस्कृत ग्रंथांची नंतरच्या काळात लॅटीन, अरबी भाषेत भाषांतरे झाली. तो पर्यंत या विषयी पाश्चात्यांचे ज्ञान अतिशय तोकडे होते. उलट भारतात मात्र वैज्ञानिकांच्या पिढ्यानपिढ्या या क्षेत्रात काम करीत होत्या.

गणितातील भारतीय शोधांविषयी विल्यम्स ड्युरंट त्यांच्या ‘हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन’ या पुस्तकात म्हणतात, “It is India that gave us ingenious method of expressing all numbers by ten symbols, each receiving a value position as well as an absolute value”.

◆ चार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या यजुर्वेद संहितेमध्ये १० च्या १२व्या घातांकापर्यंत मोजण्याची पद्धतमाहिती होती.सहाव्या शतकातआर्यभट्टाने शोधलेल्या वर्गमूळ, घनमूळ, क्षेत्रफळ, अंकश्रेणी (Arithmetic Progression), π(पाय) ची किंमत इ.चार गणितीय ग्रंथांची सातव्या शतकात लॅटीन भाषेत भाषांतरे झाली. ब्रह्मगुप्ताने शोधलेली वर्गसमीकरणे, भास्कराचार्यांनी शोधलेले कॅलक्युलस, इन्फिनिटी, २७०० वर्षापूर्वी बोधायनाने शोधलेली क्षेत्रफळाची सूत्रे – बोधायन प्रमेय (हल्ली इंग्रजी शिक्षण पद्धतीत आपण त्याला पायथागोरसचे प्रमेय म्हणतो), कात्यायनाने शोधलेलेBinomial theorem हे आणि इतर अनेक शोध म्हणजे पाश्चात्यांच्या प्रायोगिक विज्ञानाच्या कित्येक सहस्त्रे आधी लावलेल्या शोधांचे पुरावे होत.

अधिक वाचा  'ती'च्या मानसिक सबलीकरणाचे महत्व आणि स्वयंपूर्ण उपचार

◆ हायड्रोजन व परमाणू बॉम्ब निर्मितीमध्ये मोठे योगदान देणारे नोबेल पारितोषिक विजेते जागतिक किर्तीचे भौतिक शास्त्रज्ञएडवर्ड टेलर यांनी लिहिलेल्या ‘सिम्ल्पिसिटी अँड सायन्स’’ ह्या पुस्तकात गणितातील प्रश्न सहज, सरळ व सुगमरित्या सोडवण्यासाठी ‘बोधायन प्रमेय’चा उल्लेख केला आहे. ज्याचा शोध किती तरी वर्षे आधी बोधायन ऋषींनी लावला होता आणि हे प्रमेय पायथागोरसच्या प्रमेयाच्या मांडणी पेक्षाही सोडवायला सोपे जाते असे म्हटले आहे.

◆ पाचव्या शतकात प्रसादपादाच्या ‘पदार्थधर्मसंग्रह’ तसेच व्योमशिवाचार्यांच्या ‘व्योमबती’ या ग्रंथात पदार्थविज्ञानात लावलेल्या शोधांविषयी माहिती आहे. युरोपमध्ये हे सिद्धांत चौदाव्या शतकात मांडले गेले.

प्रख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ सर बर्नाड लॉवेल यांनी ‘द ओरिजिन अँड इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स ऑफ स्पेस एक्सप्लोरेशन ‘ या पुस्तकात विल्यम्स कॉनग्रेव्हने भारतीय अभियंत्यांनी विकसित केलेल्या  आणि श्रीरंगपट्टणम येथील लढाईत वापरलेल्या अग्निबाणांचा(रॉकेटस्)अभ्यास केला. युरोपीयनांना कॉनग्रेव्हने केलेल्याअभ्यासाबद्दल सर्व माहिती असते. दुर्दैवाने ज्या भारतीय वैज्ञानिकांनी/अभियंत्यांनीअग्निबाणाची निर्मिती केली त्याबद्दल आम्हा भारतीयांना काहीच माहिती नसते.

अधिक वाचा  जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला-  ‘मुलखावेगळी ती’: धीरोदात्त मृण्मयी परळीकर 

◆ १९१८ मध्ये प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ व वैज्ञानिक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी मद्रास विद्यापीठात केलेल्या भाषणात म्हटले होते की, “We are not ashamed of our ancient contribution to the science of Chemistry.I am equally proud of and not ashamed for, all the branches of science  that  grew in ancient India.”(प्राचीन भारतात विकसित झालेल्या सर्वच विज्ञान शाखांबद्दल माझे अंतःकरण लज्जान्वित तर होत नाहीच परंतु मला ते अभिमानास्पद वाटते.)

◆ भारतीय वैज्ञानिक परंपरा हजारो वर्षांपासून अस्तित्वात होती. आपल्या स्वतःच्या विशिष्ट विचारप्रदर्शनासाठी येथे कुणालाही कैदेत टाकले गेले नाही किंवा जिवंत जाळले गेले नाही. चार्वाकाने ‘त्रयो वेदस्य कर्तारः भण्डधूर्तनिशाचराः’ म्हणजे वेद आणि वेदनिर्मात्यांची संभावना पाखंडी, धूर्त, निशाचर  अशी केली तरी त्याच्याशी कोणी वाईट व्यवहार केला नाही उलट त्यालाही एक दर्शनकार म्हणून स्थान मिळाले.

या सर्व उदाहरणांवरून प्रतीत होते की, अंधश्रद्धा टाळून तार्किक पद्धतीला अग्रक्रम दिला गेला. विचार करण्याची आणि प्रयोग करण्याची भारतीय विज्ञान परंपरा हजारो वर्षांपासून अस्तित्वात होती.

विवेक जोशी ◆

(लेखक  डी.आर.  डी. ओ चे माजी अधिकारी असून भारतीय विचारसाधना चे विश्वस्त आहेत.)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love