मला एक दिवस मुख्यमंत्री करा:‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुले हे त्यांच्या विविध वक्तव्यामुळे नेहेमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मला एक दिवस मुख्यमंत्री करा ,बघा मी संपूर्ण मंत्रीमंडळ व प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो असे पत्र लिहिले आहे.

बिचकुले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे कुटुंबप्रमुख आहात आणि गेल्या वर्षभर आपणच आपल्या बंगल्यामधून बाहेर येत नाही आहात. आपण मुख्यमंत्री या नात्याने प्रशासनावर तसेच सहकारी मंत्र्यावर काहीही अकुंश ठेऊ शकला नाहीत. हे तमाम राज्याला माहिती आहे.

कोरोना महामारीमध्ये आपण व आपले सरकार नियोजनामध्ये कमकुवत आहे हे जनतेच्या निदर्शनास आले आहे. गेले दहा महिने लॉकडाऊन करुन आपण कोरोना प्रतिबंध केला असे भासवत असाल परंतु त्याही पेक्षा सर्वसामान्य जनता, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी आणि विशेष करुन आम्हा कलाकरांवर उपासमारीची वेळ आली हे विसरुन चालणार नाही.

परवाच आपण फेसबुक लाईव्ह मध्ये जनतेला हिंदीमध्ये विचारले, बहनो और भाईयो आप बोलीये हे किती हास्यास्पद आहे. जनतेचा आवाज ऐकण्यासाठी आपण घरातून कधी बाहेरच पडला नाही आहात.

कोरोनाच्या दुस-या टप्प्यामध्ये लॉकडाऊन हा पर्याय असूच शकत नाही आणि जर लॉकडाऊन झाला तर सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल होईल याचा विचार आपण करावा. आज रोजी याठिकाणी मी आपणांस जनतेची तथा संपूर्ण माझ्या राज्याची मला आस्था असलेने बेरोजगार, उद्योजक, शेतकरी, विशेष म्हणजे कलाकार व हातावरचे पोट असलेल्या सर्व लोकांची मला आस्था असलेने पोटतिडकीने मी पुढील विषय आपणांस सांगू इच्छित आहे.

आपण व आपले सहकारी मंत्री हे निष्क्रिय आहेत तसेच प्रशासनावर सरकारची पकड नाही हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्याप्रकारे आपण मुख्यमंत्री झालात त्याचप्रकारे जनतेच्या सेवेसाठी आपण मला एक दिवस स्वेच्छेने राजीनामा देऊन किंवा सक्तीच्या रजेवर जाऊन मला फक्त एक दिवस मुख्यमंत्री पदावर नियुक्त करा मग बघा मी संपूर्ण मंत्रीमंडळ व प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो व महाराष्ट्रातील जनतेला सामान्यपणे जगण्यासाठी जीवन सुलभ करुन दाखवितो. त्यायोगे संपूर्ण जग माझ्या नियोजनाला सलाम करेल.

माझ्या आत्मविश्वासाच्या जोरावर राज्यातल्या जनतेचा आवाज म्हणून मी हे आपणांस सांगत आहे. त्यापध्दतीने मला एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून काम करणेची संधी देऊन आपण भारताच्या राजकारणात महातिहास घडवावा ही अपेक्षा. ते हो फक्त आणि फक्त माझ्या राज्यातील सर्व जनतेसाठी कारण जनता ही राज्याची मालक आहे आणि जनतेची सेवा करणे हेच माझे ध्येय आहे एक दिवसाचा मुख्यमंत्री बनून.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *