Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

“भ्रष्टाचारास राजमान्यता देणाऱ्या ‘विकसीत भाजप”ला सत्तेवरून खाली खेचा -गोपाळदादा तिवारी

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे – देशाची सर्वाधिक सार्वजनिक संपत्ती खाजगी ऊद्योजक मित्रांच्या घशात घालणारेच् देश आर्थिक दृष्ट्या स्वावलंबनाची भाषा करतात हे केवळ हास्यास्पदच नव्हे तर कोडगे पणाचे लक्षण असल्साची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!

डॅा मनमोहन सिंग यांचे युपीए १ व २ काळात, देशातील २६ कोटी जनता ‘दारिद्र्य रेषे बाहेर’ आली, ज्या २०१४ च्या काळात देशाची आर्थिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल सुरु झाली होती.

ही सत्य वास्तवता असतांना,  ७० वर्षात पहील्यांदा खाजगी ऊद्योगपतींचे उच्चांकी कर्ज माफ केले, ७० वर्षात प्रथम ऊच्चांकी बँक धोटाळे करून, देशास आर्थिक चुना लाऊन भाषणजीवींचा मित्र परीवार पसार झाला,

ज्या ‘मोदी सरकारच्या काळात’ आरबीआय च्या ‘गंगाजळीस पहील्यांदा नख लागले’, कोट्यावधींच्या

नोट बंदीच्या माध्यमातून ‘अब्जावघींचा काळा पैसा सफेद होऊन’ (ईति – सुप्रिम कोर्ट) देशाच्या अर्थ व्यवस्थेच्या पाठीत सुरा खुपसणारे व देशाशी प्रतारणा करणारे कुटील कृत्य केले… त्यांनी या विषयी बोलावे म्हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को’ म्हणी प्रमाणे आहे..! या धादांत खोटे पणाची, निर्लज्ज राज्य कर्त्यांना थोडी ही नैतिक पातळींवर चाड वाटत नाही..!

देशाच्या सार्वजनिक संपत्तीची लूट करणे, जनतेस महागाईच्या व बेरोजगारीच्या खाईत ढकलणे, देशातील तरुणांना रोजगारीच्या नावावर विदेशात गुलाम म्हणून जाऊ देणे या भयानक वास्तवास मोदी सरकार बगल देत असून, शिताफीने जाहिराती द्वारा सतत खोटा आभास निर्माण करण्याचा निंद्य प्रयत्न करत आहे..!

नुकतेच भाषणजीवी  प्रधान सेवकांनी “एक भी भ्रष्टाचारी को छोडुंगा नही”..(?) हे वक्तव्य केल्याचे जनतेने पाहीले असुन.. त्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना मोदी शहांच्या विकसीत भाजपचे लक्ष्य असल्याची प्रतिती देखील देशवासियांना रोज येत असल्याचे प्रतिपादन ही काँग्रेस ने केले..! कारण १० वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दस्तूरखुद्द भाषणजीवी त्यांचे वर कारवाई करण्या ऐवजी.. ‘रेड कार्पेट’ टाकत असल्याचेच दिसुन येत आहे..!

धादांत खोटे बोलणे व दिशाभुल करणे हाच मोदी सरकारचा एकमेव अजेंडा असुन, ‘लातों के भूत बातोंसे नही मानते’ या उक्ती प्रमाणे,मोदी – शहांच्या प्रयोग – शाळेतील “भ्रष्टाचारास राजमान्यता देणाऱ्या ‘विकसीत भाजप”ला निवडणुक प्रक्रिये द्वारे धक्के मारुन सत्तेवरून खाली खेचणे आवश्यक असल्याचे आवाहन देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *