Pune's Neverrekar Health Home debuts in Amrit Mahatsava year

पुण्यातील नेवरेकर हेल्थ होमचे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण : कोकणी मसाल्याचे मांसाहारी जेवण व रस्स्यासाठी प्रसिध्द

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- खास बोलाईचे मटणाचे जेवणासाठी प्रसिध्द पुणे येथील लक्ष्मी रोडवरील ‘नेवरेकर हेल्थ होम’, मंगळवार दि. 09 एप्रिल, 2024 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.

खास भंडारी पध्दतीचे कोकणी मसाल्याचे मांसाहारी जेवण व रस्स्यासाठी प्रसिध्द असलेल्या नेवरेकर हेल्थ होमची स्थापना 1950 साली गुढीपाडव्याच्या शुभदिनी कै. केशव कृष्णाजी नेवरेकर यांनी पुण्यातील लक्ष्मी रोडवर गणेश पेठेत मध्यमवर्गीय व सामान्य ग्राहकास परवडेल व आवडेल अशा कोकणी पध्दतीच्या मांसाहारी खानावळीची स्थापना करुन व्यवसायाचा श्रीगणेशा केला.

अपेक्षेप्रमाणेच पुण्यातील चोखंदळ ग्राहकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला व अल्पावधीतच नेवरेकर हेल्थ होमच्या पदार्थांची चव पुणेकरांच्या जिभेवर रेंगाळू लागली. व्यवसायाच्या स्थापनेपासूनच दुरदृष्टीने हुतूतूपटू असलेली आपली दोन्ही मुले कै. दिनानाथ केशव उर्फ भाई नेवरेकर आणि कै. जयवंत केशव नेवरेकर यांना व्यवसायात घेऊन मराठी माणसाने नोकरीचे मागे न लागता उद्योग-व्यवसाय करावा हा आदर्श केशवरावांनी घालून दिला. त्यांचा हा विश्‍वास आज त्यांची चौथी पिढी सार्थ ठरवित आहे.

संतुष्ट ग्राहक हाच कुठल्याही व्यवसायाचा मोठा आधार व प्रसिध्दीकर्ता असतो. त्यामुळे नेवरेकरांचे खानावळीतील खास बोलाईच्या मटणाचा रस्सा, चिनॉय राईस, फिश फ्राई आदि पदार्थांची चव घेण्यास उत्सुक असलेल्या पुणेकरांची पावले नेवरेकर हेल्थ होमकडे वळू लागली. सिक्कीमचे मा. राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, पोलीस महासंचालक शिवाजीराव बारावकर, सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील, तसेच राष्ट्रपती पदक विजेते वगसम्राट दादू इंदुरीकर, विठाबाई नारायणगांवकर तसेच सिने क्षेत्रातील सुर्यकांत व चंद्रकांत मांढरे, दादा कोंडके, निळू फुले, राम नगरकर, लिला गांधी, उषा नाईक तर गझलसम्राट सुरेश भट, साहित्यिक ग.ल. ठोकळ, क्रिडा क्षेत्रातील सचिन तेंडूलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर, हिंदकेसरी गणपत आंदळकर, मारुती माने, एकनाथ सोलकर आणि राजकीय क्षेत्रातील पुण्याचे माजी महापौर, मा. मोहनसिंग राजपाल, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, कै. शिवाजी ढेरे, माजी खासदार कै. विठठल तुपे, कै. वसंत चव्हाण, रंगराव पाटील, बाळासाहेब गोरे, माजी मंत्री मा. बाळासाहेब शिवरकर, उपमहापौर रामदास पवार, आमदार रविंद्र धंगेकर, आमदार दिपक पायगुडे, आमदार सुभाष सर्वगौड, पीएमटी अध्यक्ष रविंद्र माळवदकर, स्टॅडींग कमिटी चेअरमन गणेश बिडकर, सभागृह नेते आबा बागुल, विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, शिक्षणमंडळ अध्यक्ष दिपक मानकर, नगरसेवक मनिष साळुंके, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. विजय सावंत, जेष्ठ पत्रकार प्रल्हाद सावंत, पराग करंदीकर, सुनील माळी, अबीद शेख, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन विकास काकतकर, प्राचार्य डॉ.मो.गो.धडफळे, शंकरराव हांडे गुरूजी, दत्तात्रय जगताप गुरूजी तसेच पोलीस अधिकारी, पत्रकार, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील, वकील, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येथून जेवणाचा आस्वाद घेतला आहे. स्थापनेपासून 15 ते 20 प्रकारचे मांसाहारी पदार्थ मिळायचे परंतु आता जमाना बदलत गेला. तसतसे पदार्थांची संख्या वाढत गेली. आता 100 प्रकारच्या नॉनव्हेज डिश उपलब्ध आहेत.

95 वर्षीय साधना नेवरेकर या नेवरेकर हेल्थ होमच्या संचालिका असून सर्वश्री सुनील, सोनिया, भारती व चौथ्या पिढीतील पवन नेवरेकर हे सध्या हॉटेलचे कामकाज पहात आहेत.  

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *