संतांच्या पालख्यांना जसे वारकरी जोडले जातात त्याप्रमाणे संजय दांडेकर यांनी माणसे जोडली

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या संतांच्या पालख्यांना जसे वारकरी जोडले जातात त्याप्रमाणे संजय दांडेकर यांच्या सर्वसमावेशक वृत्तीने, मनमिळाऊ स्वभावाने आणि सहकार्याच्या भावनेने त्यांच्याशी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीतील कर्मचाऱ्यांबरोबरच विमा प्रतिनिधि आणि ग्राहक जोडले गेले आणि त्यातून त्यांचे सर्वांशी एक घट्ट नाते निर्माण झाले असे गौरोद्गार दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विजय टॉकीज विभागीय कार्यालयाचे (१५३५००) वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अरूप कुमार नाथ यांनी काढले.

दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विजय टॉकीज विभागीय कार्यालयाचे (१५३५००) वरिष्ठ सहाय्यक संजय मधुकर दांडेकर यांच्या सेवानिवृत्ती निरोप कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अरूप कुमार नाथ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपविभागीय व्यवस्थापक सचिन चाबुकस्वार, सौ. स्वाती दांडेकर हे उपस्थित होते.

अरूप कुमार नाथ म्हणाले, दांडेकर पंढरपूर सारख्या देवभूमीतून आल्याने त्यांच्या रक्तातच एक सेवाभाव आहे. अत्यंत मितभाषी परंतु, सर्वांना मदत करणारे असे हे व्यक्तिमत्व. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विजय टॉकीज विभागीय कार्यालयात आल्यानंतर ते कधी सर्वांचे झाले हे कळलेच नाही. त्यांच्या सर्वांना मदत करण्याच्या स्वभावामुळे ते सर्वांचे चाहते झाले. विशेषत: विमा प्रतिनिधींना त्यांची खूप मदत झाली. न कंटाळता काम करत राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विजय टॉकीज विभागीय कार्यालयाने (१५३५००) व्यवसायात जे ध्येय गाठले त्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

उपविभागीय व्यवस्थापक सचिन चाबुकस्वार, श्री सुनील कुंभार, श्री अनिल भोंडरे, श्री शिरीष बीडकर, श्री भानुदास जगताप, सौ. सुप्रिया तांबे, श्री चंद्रकांत शहा आणि राजेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दांडेकर म्हणजे प्रत्येक समस्येला उत्तर, न कंटाळता काम करण्याचा त्यांचा स्वभाव, सहकार्याची भावना यामुळे त्यांचा कार्यालयाला आणि विमा प्रतिनिधींना खूप उपयोग झाला अशा भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केल्या व दांडेकर यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सद्भावणा व्यक्त केल्या व शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक अधिकारी सौ.पोर्णिमा शहाणे यांनी केले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *