Senior Journalist Manohar Kulkarni conferred Govind Samman Award

ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांना गोविंद सन्मान पुरस्कार प्रदान

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे –ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांना या वर्षीचा ‘गोविंद सन्मान’ पुरस्कार डॉ. प्रफुल्ल मिरजगावकर यांच्या हस्ते  नुकताच प्रदान करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथील गरूड अॅड संस्थेचे  संस्थापक आणि  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. गोविंद देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त गेली १७ वर्षे स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.  यावर्षी छत्रपती संभाजी नगर येथील भानुदास चव्हाण सभागृहात  नुकताच हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांना या वर्षीचा ‘गोविंद सन्मान’ पुरस्कार डॉ. प्रफुल्ल मिरजगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल श्रीफळ, अकरा हजार रुपये रोख व  सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

गेल्या आठ वर्षापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला ,साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणार्याज मराठवाड्यातील ज्येष्ठ नागरिकांना कै. गोविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘गोविंद सन्मान’  पुरस्कार देण्यात येतो. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रशांत दिक्षीत यांचे ‘व्यथित हिंदू ते खंबीर हिंदू  बदलता राजकीय भारत’ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी नामदेव शिंदे, प्राची शिंदे, श्रीकांत उमरीकर, अॅड.संध्या कुलकर्णी माधुरी गौतम, डॉ. प्रफुल्ल मिरजगांवकर, अनिल पाटील, धनंजय दंडवते आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोहर कुलकर्णी यांनी पुरस्काराची अकरा हजार रुपये रक्कम आयोजकांना विविध सामाजिक उपक्रमासाठी देणगी  दिली. तसेच आपल्या पत्रकारितेच्या  कारकिर्दीबद्दल आणि कै. देशपांडेच्या आठवणींना उजाळा दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *