पुणे–मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती असून, त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. अन्यथा, आरक्षणासाठी आपल्याला पुन्हा लढा उभारावा लागेल, असा निर्धार माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
पुण्यात शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर व संभाजीराजे यांची आज भेट झाली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मी उपोषण केले. मराठा समाजाला आरक्षण दिले, ते देवेंद्र फडणवीस आज उपमुख्यमंत्री आहेत, तर ज्यांनी उपोषण सोडताना आश्वासन दिले, ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांना या प्रश्नाबाबत सर्व माहिती आहे. ते मराठा समाजाचे आहेत. मात्र, वेळ आली, तर आरक्षणासाठी आपल्याला परत लढायला लागेल. पुन्हा लढा उभारावा लागेल. मराठा समाजाला मूलभूत सुविधा द्याव्यात. मराठा समाजाला सामाजिक मागास ठरविण्यासाठी आयोगाची नेमणूक करण्यात यावी. त्यासाठी तातडीने बैठक बोलवावी आणि समाजाचे प्रश्न सोडवावेत. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघाbनाहि आमंत्रित करावे. मराठा आरक्षणाची सगळी प्रक्रिया आता परत करावी लागणार आहे. मागासवर्गीय आयोग स्थापन करावा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेने खासदारकी दिली नाही, हा माझ्यासाठी इतिहास झाला आहे. शिवसेनेने शब्द पाळला नाही. माझी त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही. आता स्वराज्यच्या माध्यामातून अनेक सामाजिक कामे हाती घेतली असून, गरजू, सामान्यांना ताकद देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राजकीय पक्षासाठी अनेक गोष्टी लागतात. मात्र, प्रश्न सुटले नाहीत, तर नक्कीचपक्ष काढायचा विचार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केसरकर पर्यटनमंत्री व्हावेत ही संभाजीराजेंची इच्छा
नवनिर्वाचित मंत्री दीपक केसरकर याbना पर्यटन खाते मिळावे, अशी आपली इच्छा आहे. रायगडासोबतच महाराष्ट्र पर्यटन देशभरात पोहचण्याची गरज आहे. त्यांच्यामार्फत महाराष्ट्र देशभरात पोहचेन, असा विश्वासही संभाजीराजे यांनी व्यक्त केला.